२७ जुलै २०२१
वेषांतर करून सहा महिने फरार खंङणीखोर अखेर गवसला
सहा महिन्यांपासून फरार असलेल्या वेषांतर करून राहणाऱ्या खंडणीसह इतर गुन्ह्यातील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद
जुन्नर /आनंद कांबळे
मंचर पोलिस स्टेशनचे हद्दीत लोकांकडून पैशाची मागणी करून त्यांच्याकडून खंडणी घेतले बाबत मंचर पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल होते. सदर गुन्ह्यातील आरोपी हरीश महादू कानसकर, रा. रांजणी, ता. आंबेगाव, जि. पुणे हा गुन्हे केले पासून फरार होता. मा. पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख सो. यांच्या आदेशान्वये मा. पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट सो. यांनी विशेष पथक नेमून सदर गुन्ह्यातील आरोपी हरीश कानसकर याचा शोध घेणे बाबत योग्य त्या मार्गदर्शक सूचना केल्या होत्या. सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध चालू असताना पद्माकर घनवट सो. यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी हरीश कानसकर हा दातिवली दिवा मुंबई या ठिकाणी राहत असल्याची माहिती मिळाल्याने सपोनि नेताजी गंधारे यांनी टिमसह जावून संशयित इसमास ताब्यात घेतले असता त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव हरीश महादू कानसकर, सद्या रा. दातिवली, दिवा, मुंबई मुळ रा. रांजणी, ता. आंबेगाव, जि. पुणे असे असल्याचे सांगितले. सदर बाबत मुंब्रा पोलीस स्टेशन येथे माहिती देऊन त्यास ताब्यात घेऊन त्याची अटकपूर्व वैद्यकीय तपासणी करून पुढील तपास कामी मंचर पोलिस स्टेशनचे ताब्यात दिले आहे.
सदर आरोपीवर मंचर पोलीस स्टेशन येथे
१) गु.र.नं. ६३/२०२१ मुं.प्रो.का.क.६८
२) गु.र.नं. ६९/२०२१, भा. दं. वि. कलम 384, 385
३) गु.र.नं ७०/२०२१, भा. दं. वि. कलम 384, 385
४) गु.र.नं ७१/२०२१, भा. दं. वि. कलम 384, 385
५) गु.र.नं ७४/२०२१, भा. दं. वि. कलम 328,188, 272, 273 सह मुं. प्रो. का. कलम 68 सह अ. सु. मा. का. क. 26(2), 26(4)
६) गु.र.नं ७८/२०२१, भा. दं. वि. कलम 384, 385, 504, 34
७) गु.र.नं ८६/२०२१ भा. दं. वि. कलम 385, 506, 34
८) गु.र.नं ८८/२०२१ भा. दं. वि. कलम 452, 384, 385, 354(अ), 355, 363, 504, 506, 34 सह अपंग व्यक्तीचे अधिकार सन 2019 चे कलम 92
९) गु.र.नं ९३/२०२१, भा. दं. वि. कलम 392, 171, 420, 34
१०) गु.र.नं ९८/२०२१, भा. दं. वि. कलम ३८४,३८५,३४*
प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई
पोलीस अधीक्षक, डॉ. अभिनव देशमुख साो. अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलीस अधीकारी लंभाते सो. यांचे मागदर्शनाखाली
पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट
सपोनि. नेताजी गंधारे, पो. हवा. दिपक साबळे पो. हवा. हनुमंत पासलकर.
पो.हवा. विक्रम तापकिर,
पो. हवा. गायकवाड
पो. ना. संदिप वारे,
पो. कॉ. अक्षय नवले,
पो. कॉ. निलेश सुपेकर,
पो. कॉ. अक्षय जावळे यांनी केली आहे
खबरबात
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.
- प्रकाशक
ईमेल [email protected]
[email protected]
