कोरोनामुळे निराधार कुटूंबाला आर्थिक मदत - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०४ जुलै २०२१

कोरोनामुळे निराधार कुटूंबाला आर्थिक मदतसावली तालुक्यातील अनेक व्यक्ती कोरोनामुळे मृत्यू झाले.यात अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला तर काही वडीलपासून तर कुणी आईच्या मायेला पोरके झाले.अशातच कुणाचं आर्थिक आधार हिरावून घेतला. अशा परिस्थितीमध्ये कुटूंबातील  व्यक्तीला आधाराची गरज असते.याची जाणीव ठेवून आपण आपल्या समाजासाठी काहीतरी देणं असत याची जाणीव ठेवून महाराष्ट्र राज्याचे बहुजन विकासव आपत्ती व्यवस्थापन मंत्री मा. ना.विजयभाऊ वडेट्टीवार 

यांनी तालुक्यातील कोरोनामुळे मृत परिवाराला आर्थिक मदत करीत आहेत.अशातला एक भाग विरखल येथील विलास माधव मेश्राम यांचा कोरोनामुळे निधन झाले त्यांच्या मागे पत्नी,व दोन मुले होते. त्यांना यावेळी आर्थिक मदत देण्यात आली यावेळी विजयभाऊ वडेट्टीवार यांचे स्वीय सहाय्य श्री प्रदीपभाऊ गद्वेवार,श्री आशिष भाऊ पुण्यपवार,श्री अतुल येलेट्टीवार,ईश्वर गंडाटे, प्रभाकर डहलकर,यावेळी उपस्थित होते.