लग्न सोहळ्यात गर्दी; ओम साई मंगल कार्यालयाला दंड - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


०२ जुलै २०२१

लग्न सोहळ्यात गर्दी; ओम साई मंगल कार्यालयाला दंड

नगरपरिषद व पोलिस विभागाची संयुक्त कारवाई.


राजुरा-  कोवीड-19 संकटामुळे कार्यक्रमासाठी शासनाने नियमावली जाहीर केलेली आहे. लग्न समारंभ व इतर कार्यक्रम घेण्यात अगोदर आता संख्येवर मर्यादा आलेली आहे. शासनाचे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आयोजकांवर नगर परिषद पथकाने 20 हजाराचा दंड ठोठावला आहे.


Covid-19 संकट काळात नगर परिषदेच्या पूर्वपरवानगीशिवाय कार्यक्रमास मान्यता नाही. कोवीड नियमाचे पालन करण्याच्या अटीवर लग्न समारंभ व लग्न सभागृहांना परवानगी देण्यात येत आहे. मात्र दिनांक एक जुलै रोजी स्थानिक ओम साई मंगल कार्यालयात आयोजित लग्नसमारंभात गर्दी झाल्याचे निदर्शनास आले.


मुख्याधिकारी जुही अर्शिया व पोलीस विभागातील कर्मचारी आणि महसूल विभागातील कर्मचारी यांच्या पथकाने कार्यक्रम स्थळी भेट दिल्याने गर्दी दिसून आली .शासनाच्या नियमाचे उल्लंघन झाल्याने आयोजकांवर व सभागृह मालकांवर दंड ठोठावण्यात आला यात सभागृह मालकांवर पाच हजाराचा दंड आकारण्यात आला तर कार्यक्रम आयोजकांवर दहा हजाराचा दंड आकारण्यात आला. नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे एकूण पंधरा हजाराचा दंड ठोठावण्यात आला .शिवाय विवेकानंद नगर येथे एका सोहळ्यात नियमाचे उल्लंघन झाल्यामुळे आयोजकांवर पाच हजारांचा दंड ठोठावण्यात आला .


ही कारवाई मुख्याधिकारी जुही अर्शीया यांच्या नेतृत्वात पार पडली .या पथकात प्रशासकीय अधिकारी विजय जांभूळकर, अक्षय सूर्यवंशी, सतीश देशमुख आणि इतर कर्मचारी समाविष्ट होते. कोविड संसर्ग अजून संपलेला नाही त्यामुळे नागरिकांनी कोविडच्या नियमांचे पालन करावे. कार्यक्रम करताना शासनाच्या नियमानुसार आयोजन करावे. गर्दी टाळावी असे आवाहन मुख्याधिकारी यांनी केले आहे.