हत्तीरोग निर्मूलनाच्या राष्ट्रीय कार्यात नागरिकांनी सहकार्य करावे - तहसीलदार विनोद मेश्राम - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


०२ जुलै २०२१

हत्तीरोग निर्मूलनाच्या राष्ट्रीय कार्यात नागरिकांनी सहकार्य करावे - तहसीलदार विनोद मेश्राम

 हत्तीरोग निर्मूलनाच्या राष्ट्रीय कार्यात नागरिकांनी सहकार्य करावे - तहसीलदार विनोद मेश्राम संजीव बडोले प्रतिनिधी.


नवेगावबांध ता २ जुलै 


हत्तीरोग दूरिकरण मोहीम २०२१ अंतर्गत दिनांक १ जुलै ते १५ जुलै  आपल्या गावात आशा कार्यकर्त्या व आरोग्य कर्मचारी  घरोघरी जाऊन प्रत्यक्ष समक्ष डिईसी व अलबेंडाझोल गोळ-या  घरोघरी येऊन मोफत , हत्तीरोग निर्मूलन करण्यासाठी गोळ्या  खाऊ घालण्यास देणार आहेत.तरी सर्व नागरिकांना तसेच २ वर्षांवरील बालकांनी ह्या गोळ्यांचे सेवन करून हत्तीरोग निर्मूलनाच्या राष्ट्रीय कार्याला सहकार्य करावे.असे आवाहन अर्जुनी मोरगाव तालुक्याचे तहसीलदार विनोद मेश्राम व तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर विजय राऊत यांनी तालुक्यातील समस्त नागरिकांना केले आहे. काल 30 जून रोज बुधवार ला  तालुका आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयात संबंधितांची बैठक पार पडली. यात त्यांनी आव्हान केले. बैठकीला वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुरेंद्र खोबरागडे यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. नागरिकांनी आपल्या मनात कोणतीही शंका न ठेवता ह्या गोळ्यांचे सेवन करावे व आपल्या पुढील पिढीला ह्या रोगापासून दूर ठेवण्यासाठी या राष्ट्रीय कार्यात आपले अमूल्य योगदान करावे. असे आवाहनही आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.