इयत्ता पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षांचा मार्ग मोकळा | तारीख घोषित Class V, VIII Scholarship examinations - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२१ जुलै २०२१

इयत्ता पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षांचा मार्ग मोकळा | तारीख घोषित Class V, VIII Scholarship examinationsसन २०२०-२१ च्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) कोरोना प्रतिबंधक सर्व नियमांचे पालन करून ८ ऑगस्ट २०२१ रोजी घेण्यास शालेय शिक्षण विभागाच्या वतीने मान्यता देण्यात आली आहे.

इयत्ता पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षांचा मार्ग मोकळा झाला आहे. ही परीक्षा ऑगस्टमध्ये होणार आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात घोषणा केली. त्यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरुन यासंदर्भातील माहिती जाहीर केली आहे.

२०२०-२१ च्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) ऑगस्टमध्ये होणार आहेत. या परीक्षेदरम्यान कोरोना प्रतिबंधक सर्व नियमांचे पालन केले जाणार आहे. शिष्यवृत्ती परीक्षा ८ ऑगस्ट २०२१ रोजी घेण्यास शालेय शिक्षण विभागाच्या वतीने मान्यता देण्यात आली आहे.

याआधी ही परीक्षा फेब्रुवारीच्या दुसऱ्या/तिसऱ्या रविवारी घेण्यात येणार होती. त्यानंतर करोना पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुढे ढकलून एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या रविवारी घेण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली होती. पण करोनाची परीस्थिती नियंत्रणात न आल्याने पुन्हा या परीक्षेला स्थगिती देण्यात आली.

Class V, VIII Scholarship examinations 

scholarship exam2021

Education Minister Varsha Gaikwad

परीक्षार्थींना मनापासून शुभेच्छा! #शिष्यवृत्ती