Top News

Civil20 India Inception Meet starts at Nagpur

  The future belongs not to single entities but to those who cooperate and mingle and everyone must obey the universal law of inclusion: Cha...

ads

बुधवार, जुलै २१, २०२१

काॅन्व्हेंटमध्ये शिकणारे अनेक विद्यार्थी आता मनपाच्या शाळेत | Chandrapur Municipal Corporation

चंद्रपूर महानगरपालिकेनं आता आपल्या शाळा अद्यावत करण्याचं ठरवलं. त्यादिशेनं पहिलं पाऊल महापालिकेनं टाकलं. चंद्रपूर शहरातील बाबूपेठ भागातील ही शाळा बघा. पहिली ते दहावीचे वर्ग इथं चालतात. सेमी इंग्रजी माध्यम. शाळा बघताच एखादी खासगी शाळा असावी, असा भास होतो.


एकीकडे शासकीय मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असल्याची ओरड होत असताना चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या मराठी, हिंदी, उर्दू, आणि तेलगु शाळा प्रगतीपथावर आहेत. कोरोणाच्या काळामध्ये या शाळांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन शिक्षण पद्धतीचा अवलंब करत नवी क्रांती घडविली आहे. डिजिटल पद्धतीने शिक्षण प्रणाली सुरु केल्यामुळे काॅन्व्हेंटमध्ये शिकणारे अनेक विद्यार्थी आता मनपाच्या शाळेत प्रवेश घेऊ लागले आहेत.

चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागांतर्गत एकूण 29 शाळा कार्यरत आहेत. यामध्ये तीन शाळेमध्ये तेलुगु, तीन शाळेत हिंदी, तीन शाळेत उर्दू आणि 21 शाळेत मराठीच्या माध्यमातून शिकविण्यात येते. एकूण सोळा शाळांमध्ये नर्सरी, केजी वन,केजी टू आदी शिक्षणसुद्धा दिले जात आहे. सुमारे 840 विद्यार्थी पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी पटसंख्या आहे. दहा शाळांच्या माध्यमातून सेमी इंग्रजी चे शिक्षण सुरू आहे.

2016 - 17 या वर्षी 2571 आसपास पटसंख्या होती. ती यावर्षी शैक्षणिक सत्र 2021 -22 मध्ये 3454 इतकी झाली आहे. याचा अर्थ कॉन्व्हेंट मधील विद्यार्थी आता मनपाच्या शाळेत प्रवेश घेऊ लागले आहेत. महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने ऑफलाइन आणि ऑनलाईन शिक्षण पद्धत अमलात आणल्याने विद्यार्थी संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. शहरातील अनेक मराठी शाळांमध्ये दुप्पट पटसंख्या झाल्याचे उदाहरण या वर्षी पाहायला मिळत आहे. या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी मराठी माध्यमाचे 62 शिक्षक हिंदी माध्यमाचे पाच शिक्षक उर्दू माध्यमाचे दोन शिक्षक आणि तेलुगु माध्यमातून पाच शिक्षक कार्यरत आहेत.


महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने ऑफलाइन आणि ऑनलाईन शिक्षण पद्धत अमलात आणल्याने विद्यार्थी संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. शहरातील मनपाच्या मराठी शाळांमध्ये पटसंख्या वाढल्याचे उदाहरण या वर्षी पाहायला मिळत आहे. महानगरपालिकेचे शिक्षण विभाग, शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक आणि शिक्षकांचे उपक्रम कौतुकास्पद आहेत.

- राखी संजय कंचर्लावार, महापौर 


कोरोनाच्या काळातही सर्व नियम पाळून आणि आरोग्याची काळजी घेत मागील वर्षी मनपाच्या शिक्षण विभागाने विविध उपक्रम राबविले. शाळा बंद असतानाही विद्यार्थी अभ्यासात मागे पडला नाही. शक्य तिथे ऑनलाईन पद्धतीने आणि जे विद्यार्थी मोबाईल घेऊ शकत नाही, अशाना त्यांच्या घरी जाऊन शिकविण्याचे काम शिक्षकांनी केले. त्यामुळे यावर्षी मनपाच्या शाळेत प्रवेशासाठी गर्दी झाली आहे. 

- राजेश मोहिते, मनपा आयुक्त



संबंधित शोध


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.