चंद्रपूर : लष्कर कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१३ जुलै २०२१

चंद्रपूर : लष्कर कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू
चंद्रपूर/ प्रतिनिधी
दुर्गापूर येथे जनरेटर गॅसच्या गळतीने एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली.
दुर्गापूर परिसरातील वीजपुरवठा खंडित झाल्याने विजेसाठी जनरेटर सुरू केले होते. अशातच हे कुटुंब झोपी गेले आणि गॅस गळती होऊन मोठी दुर्घटना घडली. हा प्रकार दिसताच शेजारी राहणारे लोकांनी आरडाओरड केली. जनरेटरमधील गॅस गळतीमुळे एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला.
मृतांमध्ये एका आठ वर्षाच्या मुलासहीत १४ वर्षीय मुलीचाही समावेश आहे.


दूर्गापुर येथील कंत्राटदार रमेश लष्कर यांच्यासहीत कुटुंबातील सहा जणांचा जनरेटरमधील गॅस गळतीमुळे मृत्यु झाला. मृतांमध्ये अजय लष्कर (२१), रमेश लष्कर (४५), लखन लष्कर (१०), कृष्णा लष्कर (८), पूजा लष्कर (१४), माधुरी लष्कर (२०) यांचा समावेश आहे. दहा दिवसांपूर्वी या कुटुंबात विवाह झाला होता.

घटनेची माहिती कळताच दुर्गापूर पोलिसांची चमू घटनास्थळी दाखल झाली. पुढील तपास सुरू आहे.