"अगर हमारा व्हिडीओ कल व्हायरल हुआ तो तुझे काट डालेंगे" | - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

गुरुवार, जुलै १५, २०२१

"अगर हमारा व्हिडीओ कल व्हायरल हुआ तो तुझे काट डालेंगे" |


चंद्रपूर : जिल्हयातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी दारूबंदी हटविण्यात आली. आता पेदाड्यांना वैध मार्गाने दारू मिळू लागली आहे. मात्र, सध्या बारमध्ये बसून पिण्याची सोय नसल्यानं शॉपमधून बॉटल घेऊन बेवडे आता आडोसा शोधून ठोसू लागले आहेत.

 Chandrapur Crime City

जुन्या वादात चंद्रपूर शहरातील गजबजलेल्या रघुवंशी कॉम्प्लेक्समध्ये भरदिवसा एका युवकावर गोळीबार करण्यात आला. एवढी हिम्मत तरी होते कशी? पोलिसांचा वचकच राहिला नाही. शहरात संघटित गुन्हेगारीमध्ये आता वाढ होत आहे. 14 जुलैला भरदुपारी वरोरानाका चौकात 10 ते 15 युवकांनी एकाला बेदम मारहाण केली. त्याच दिवशी जनता कॉलेज चौकातही मारामारी झाली. वरोरानाका चौकात अगदी प्रेसक्लबसमोर एका पत्रकाराला "अगर हमारा व्हिडीओ कल व्हायरल हुआ तो तुझे काट डालेंगे" अशी धमकी देत त्यांचा हातात असलेला मोबाईल हिसकविण्याचा प्रयत्न केला. शासनाने ज्या प्रमुख उद्देशासाठी ही दारू सुरु केली, ती गुन्हेगारी मात्र कमी होण्याची सुतराम शक्यता नाही. जिल्ह्यातील दारूबंदी उठली आणि गुन्हेगारी वाढली, अस म्हणणे आता वावगं ठरणार नाही.

14 जुलैला वरोरा नाका चौकात 10 ते 15 युवक एकाला बेदम मारहाण करीत होते. बघ्यांची गर्दी झाली. मात्र कुणीही त्या भांडणाला सोडविण्याचा प्रयत्न केला नाही. चित्रपटाची शूटिंग सुरु असल्यागत सारेजण मजा घेत होते. वरोरा नाका चौकात श्रमिक पत्रकार संघाचे कार्यालय आहे. त्यासमोर उभे असलेल्या ANI चे जिल्हा वार्ताहर प्रकाश हांडे यांनी मारहाणीच्या दृश्याला कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न केला. चित्रीकरण केलेसुद्धा नाही. मारहाण करीत असलेल्या एका युवकांची नजर हांडे यांच्यावर पडली आणि तो धावत आला. अगर हमारा व्हिडीओ कल व्हायरल हुआ तो तुझे काट डालेंगे" अशी धमकी देत त्यांचा हातात असलेला मोबाईल हिसकविण्याचा प्रयत्न केला. लागलीच सारे मारेकरी भोवताल जमले. हांडे याना घेरण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी संधीचा फायदा घेत मार खाणारा पहिला तरुण रक्तबंबाळ चेहऱ्याने निसटला. जर चित्रीकरणाचे निमित्त आले नसते तर त्या तरुणाचा सर्वासमक्ष खूनच झाला होता. इकडे झटापट वाढत असताना काहींनी मध्यस्ती केली व लगेच रामनगर पोलिसांना फोन करण्यात आला. मात्र, पोलिसांनी नेहमीप्रमाणे येण्यास विलंब केला. तोवर ते तरुण पसार झाले. मग, पोलीस आले. पण, काय फायदा. सायंकाळच्या सुमारास ते सर्व आरोपी युवक पुन्हा वरोरा नाका चौकात जमा झाले होते. त्यावेळी सुद्धा पोलिसांना फोन करण्यात आला. मात्र, यावेळी पोलीस आलेच नाही. गोळीबारच्या घटनेनंतर आता हल्ला करणारे युवक सजग झाले आहेत. मारहाण करणारे आरोपीनी काही युवक नागरिकांच्यामध्ये कुणीही व्हिडिओ किंवा फोटो काढताना दिसल्यास बदडण्यासाठी उभे केले जात आहेत. वरोरा नाका चौकात सिसिटीव्ही कॅमेरे असते तर या तरुणांना पकडणे सोयीचे झाले असते.