बेशरमचे झाड लावून अमृताच्या कंत्राटदाराचा निषेध
चंद्रपूर : वडगाव प्रभागातील हवेली गार्डन ते सोमय्या पॉलिटेक्निक रस्त्यावर मागील अनेक दिवसांपासून खड्डा पडलेला आहे. अमृत पाणी पुरवठा योजनेचा मोठा पाईप टाकल्यामुळे हा खड्डा पडला. या रस्त्यावरील पथदिवे वारंवार बंद राहतात.त्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणार्या नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. अंधारामुळे नवीन माणसाला रस्त्यावरील आडवा खड्डा दिसत नसल्याने तोल जाऊन दुचाकीस्वारांच्या अपघातांची मालिका सुरू झाली.०३ जुलै २०२१
अखेर श्रमदान करून नागरिकांनी अपघातग्रस्त खड्डा भरला
अनेकांना अपघातामुळे गंभीर शारीरिक इजा सुद्धा झाली.या खड्ड्यामध्ये पडून आज पावेतो अनेक नागरिकांचे अपघात झाले.वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झालेला होता. नगरसेवक व महानगरपालिकेला तक्रार करूनही खड्डा बुजविण्याचे काम करण्यात आले नाही.
दरम्यान 2 जुलै रोजी रात्री या ठिकाणी दुचाकीने जाणाऱ्या दोन युवकांचा अपघात झाल्याने स्थानिक नागरिक संतप्त झाले.
संतप्त झालेल्या नागरिकांपैकी स्नेहनगर परिसरातील राजेश सरोदकर, दिलीप जेठवाणी, दिलीप मेहता, विनोद राठी, गणपत कावळे, नरेंद्र पवार, अमोल वानखेडे, अजय कपूर या नागरिकांनी 3 जुलै रोजी सकाळी 7 वाजता श्रमदान करून सदर अपघातप्रवण खड्डा बुजवला.श्रमदान करून खड्डा बुजविल्यानंतर नागरिकांनी त्याच खड्ड्यात बेशरमाचे झाड लावून अमृत योजनेचे काम करणाऱ्या कंत्राटदाराचा तसेच महानगरपालिकेचा निषेध नोंदवला.
खबरबात
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.
- प्रकाशक
ईमेल [email protected]
[email protected]
