चड्डा ट्रान्सपोर्टच्या ट्रकने दुचाकीला दिली जोरदार धडक : युवक गंभीर जखमी | - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२५ जुलै २०२१

चड्डा ट्रान्सपोर्टच्या ट्रकने दुचाकीला दिली जोरदार धडक : युवक गंभीर जखमी |

घुग्गुस मार्गावरील घटना
विरुद्ध दिशेने येणाऱ्या चड्डा ट्रान्सपोर्ट (Chadda Transport - Service Provider of trucks) च्या ट्रक ने दुचाकीला जोरदार धडक दिल्याची घटना आज रविवारी घडली असून या अपघातात युवक गंभीर जखमी झाला आहे. जखमी युवकावर चंद्रपुरातील पोद्दार रुग्णालयात उपचार सुरु आहे.करन कोटावार असे अपघातात जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. करन कोटावार हा घुग्गुस मार्गे चंद्रपूरला जाण्यासाठी निघाला होता.अशातच स्नेहा सोयाबीन कंपनी अंतुरला फाट्याजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या चड्डा ट्रान्सपोर्टच्या ट्रक ने दुचाकीला जोरदार धडक दिली.मात्र धडक दिल्यावर ट्रक चालक तिथून फरार झाला.याची माहिती घुग्गुस पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून ट्रक ताब्यात घेतले आहे.या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Chadda Transport - Service Provider of trucks
Chadda Transport in Chandrapur Midc, Chandrapur is one of the leading businesses in the Transporters For Cement. s.

संबंधित शोध