इ. ११ वी प्रवेशासाठीच्या CET परीक्षेबाबतची अत्यंत महत्वाची माहिती! - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

सोमवार, जुलै १९, २०२१

इ. ११ वी प्रवेशासाठीच्या CET परीक्षेबाबतची अत्यंत महत्वाची माहिती!विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर (प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक)
इ. ११ वी प्रवेशासाठीच्या शासनाकडून घेण्यात येणाऱ्या CET परीक्षेबाबतची अत्यंत महत्वाची माहिती!

शैक्षणिक वर्ष सन २०२१-२२ साठी इयत्ता ११ वीची प्रवेश प्रक्रिया राबविताना सामाईक प्रवेश परीक्षा CET घेण्यात येणार आहे.

*दि. १९ जुलै २०२१ पासून या परीक्षेची आवेदनपत्रे भरण्यात येतील.*

*इयत्ता ११ वीची प्रवेश प्रक्रिया राबविताना सामाईक प्रवेश परीक्षा (CET Exam) दिलेल्या विद्यार्थ्यांना सामाईक प्रवेश परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्राधान्य देण्यात येईल. म्हणजेच इ. ११ वीच्या प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या टप्यामध्ये सामाईक प्रवेश परीक्षा (CET Exam) दिलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्राधान्याने प्रवेश देण्यात येईल.*

*सामाईक प्रवेश परीक्षा (CET Exam) दिलेल्या विद्यार्थ्याच्या प्रवेशानंतर, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये रिक्त राहिलेल्या उर्वरित जागा ज्या विद्यार्थ्यांनी सामाईक प्रवेश परीक्षा (CET Exam) दिलेली नाही अशा विद्यार्थ्यांसाठी खुल्या असतील व त्या जागांवर सामाईक प्रवेश परीक्षा (CET Exam) न दिलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता १० वीच्या मुल्यमापन पध्दतीनुसार मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येतील.*

*अकरावीच्या प्रवेशासाठी CET म्हणजे सामायिक प्रवेश परीक्षा ऑगस्ट महिन्यात किंवा जुलैच्या शेवटच्या आठवड्यात घेतली जाईल.*

*त्यासाठी दि. १९ जुलै २०२१ पासून या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना Online फॉर्मस् महाराष्ट्र राज्य शिक्षण व संशोधन परिषदेच्या https://www.maa.ac.in या वेबसाईट वर विद्यार्थ्यांना Online पद्धतीने भरता येतील.*

*ही परीक्षा Offline पद्धतीने होणार आहे.*

*विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र कुठे असेल हे नंतर सांगण्यात येतील.*

*पोर्टल वर क्लिक केल्यावर विद्यार्थ्यांना आपला बोर्डाचा बैठक क्रमांक भरावा लागेल.*

*नंतर परीक्षा द्यायची की नाही असे दोन पर्याय दिले जातील.*

*त्यातील योग्य पर्याय निवडून फॉर्म भरावयाचा आहे.*

 *इ. ११ वी प्रवेशासाठी असलेल्या CET परीक्षेचे स्वरुप*

*CET परीक्षेसाठी १०० गुणांची एकच प्रश्नपत्रिका / पेपर असेल.*

*परीक्षेचा कालावधी दोन तास राहील.*

*इंग्रजी, गणित, विज्ञान व समाजिक शास्त्र या विषयावर प्रत्येकी 25 प्रश्न विचारले जातील.*

*परीक्षा ऑफलाईन घेण्यात येईल.* 

*प्रश्न पत्रिकेचे स्वरुप हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाचे (Multiple Choice Objective Type Questions) असेल.*

▪️परीक्षा O.M.R. आधारीत असेल.

विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर (प्राथमिक ,माध्यमिक व उच्च माध्यमिक)