अर्जुनी मोरगाव भाजपा कार्यालयात स्व.शामाप्रसाद मुखर्जी यांची जयंती साजरी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत०७ जुलै २०२१

अर्जुनी मोरगाव भाजपा कार्यालयात स्व.शामाप्रसाद मुखर्जी यांची जयंती साजरी

 अर्जुनी मोरगाव भाजपा कार्यालयात स्व.शामाप्रसाद मुखर्जी यांची जयंती साजरीसंजीव बडोले प्रतिनिधी.


नवेगावबांध ता.7 जुलै:-


भारतीय जनता पार्टी तालुका अर्जुनी मोर चे वतीने ( ता.6 ) भाजपा कार्यालयात जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष स्व.शामाप्रसाद मुखर्जी यांची जयंती साजरी करण्यात आली. जयंती समारंभाचे अध्यक्षस्थानी भाजपा तालुका अध्यक्ष अरविंद शिवणकर होते.यावेळी केवळराम पुस्तोळे, रघुनाथ लांजेवार, चामेश्वर गहाणे, डाॅ. गजानन डोंगरवार, नुतन सोनवाने, रामदास कोहाडकर, आर.के.देशमुख, प्रकाश गहाणे, रामलाल मुंगणकर, गिरीश बागडे, मंजुषा तरोणे, मिनाबाई शहारे, गिताबाई ब्राम्हणकर, हेमलता तरजुले, संध्या शहारे, रचना वकेकार, राकेश शेंडे, लैलेश्वर शिवनकर, खुशाल नाकाडे, प्रामुख्याने उपस्थित होते.सर्वप्रथम स्व.शामाप्रसाद मुखर्जी यांचे प्रतीमेचे पूजन करुन माल्यार्पण करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्व.शामाप्रसाद मुखर्जी यांचे जिवनकार्याची माहीती दिली. संचालन गिरीष बागडे यांनी तर उपस्थितांचे आभार प्रकाश गहाणे यांनी मानले.