CBSE दहावी, बारावीच्या निकालाची घोषणा लवकरच | cbseresults.nic.in 2021 - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

२० जुलै २०२१

CBSE दहावी, बारावीच्या निकालाची घोषणा लवकरच | cbseresults.nic.in 2021

केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड (सीबीएसई) तर्फे दहावी, बारावीच्या निकालाची घोषणा लवकरच केली जाणार आहे. अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात माहिती दिली जाईल. निकालासाठी आणखी एक ते दोन दिवस लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड (Central Board of Secondary Education, CBSE) दहावी आणि बारावीच्या निकालाची घोषणा करण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार आणि सीबीएसई सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २० जुलैपर्यंत सीबीएसई दहावीच्या रिझल्टची घोषणा केली जाण्याची माहिती देण्यात आली होती. पण दहावीच्या टॅब्युलेशनमध्ये पॉलिसीला वेळ लागल्याने या निकालासाठी आणखी एक ते दोन दिवस वाट पाहावी लागू शकते.

सीबीएसई दहावी, बारावी रिझल्ट २०२१ संदर्भातील सर्व अपडेट अधिकृत वेबसाइट cbse.nic.in वर जाहीर केल्या जाणार आहेत. त्यामुळे या वेबसाइटवर वेळोवेळी लक्ष देणे गरजेचे आहे.

बोर्डाच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार सीबीएसई दहावी रिझल्टची घोषणा लवकरच केली जाणार आहे. पण बारावीच्या निकालासाठी थोडे दिवस वाट पाहावी लागणार आहे. रिझल्ट तयार करण्याची पद्धत आणि अंतर्गत मूल्यमापन पद्धतीने रिझल्ट लावला जात आहे. सीबीएसई दहावी आणि बारावीच्या निकालसंदर्भातील घोषणा एक ते दोन दिवसात केली जाणार असल्याची माहिती आहे.

cbse.gov.in/