रात्रीच्या वेळी उपमहापौरांवर गोळीबार | - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२५ जुलै २०२१

रात्रीच्या वेळी उपमहापौरांवर गोळीबार |जळगाव : उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर आज (25 जुलै) रात्री पूर्ववैमनस्यातून गोळीबार झाला आहे. हा गोळीबार हा त्यांच्या पिंप्राळा येथील घरावर झाला आहे. यात ते सुदैवाने बचावले आहेत. गोळीबाराच्या घटनेनंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.

उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर रात्री उशिरा गोळीबार झाला. यात ते सुदैवाने बचावले. रामानंद नगर पोलीस स्थानकात त्यांनी रितसर  तक्रार केली. त्यानंतर पोलीस त्यांच्या घरी घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी आले. पोलीस याप्रकरणी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे देखील तपासण्याची शक्यता आहे. गोळीबार करणारे नेमके कोण होते ते अद्याप समजू शकलेले नाही. पण या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांचा या प्रकरणी तपास सुरु आहे.