०६ जुलै २०२१
स्वामीधाम श्री स्वामी समर्थ मंदिर, बेसा, नागपूर येथे रक्तदान शिबिर
नागपूर/ प्रतिनिधी
लोकमत - पर्यावरण व निसर्ग संस्था, घोगली, नागपूर तसेच गट ग्रामपंचायत बेसा - बेलतरोडी व पिपळा - घोगली यांच्या संयुक्त विद्यमाने रक्ताचं नातं या सामाजिक बांधिलकीतून ४ जुलै रोजी 'स्वामीधाम' श्री स्वामी समर्थ मंदिर, बेसा, नागपूर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. लोकमत व लाईफ लाईन रक्तपेढीकडून रक्तदात्याला प्रमाणपत्र व भेट वस्तू देण्यात आल्या. संस्थेच्यावतीने रक्तदात्याला फळ व फुल रोपे देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी गट ग्रामपंचायत बेसाचे सरपंच सुरेंद्र बनाईत, पिपळाचे सरपंच नरेश भोयर,उपसरपंच प्रभू भेंडे , स्वामीधाम मंदिराचे अध्यक्ष दिनकर कडू, अर्ध्य सैनिक कॅन्टीनचे संचालक राहुल मानकर, चित्रकला व शिल्प संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबईचे निरीक्षक संदीप डोंगरे, खादी व ग्रामोद्योग आयोग नागपूरचे निवृत्त संचालक राहुल गजभिये,बी. एम. रेवतकर, राजेश कडू,पर्यावरण व निसर्ग संस्थेचे सचिव मधुकर सुरवाडे, कोषाध्यक्ष राजेश सोनटक्के, राजेंद्र राजूरकर, अभय पवार, राम सेवतकर, अभिराम श्रोत्री, धनंजय खराडे प्रामुख्याने उपस्थित होते. लाईफ लाईन रक्तपेढीचे डॉ. रवी गजभिये व त्यांच्या चमुने या रक्तदान शिबिरामध्ये मोलाचे योगदान दिले.लोकमतच्या या स्तुत्य उपक्रमाचे पर्यावरण व निसर्ग संस्थेने आभार मानले व भविष्यातदेखिल आपल्या समाजभिमुख उपक्रमात आमचा सहभाग राहील असे आश्वासन दिले.
खबरबात
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.
- प्रकाशक
ईमेल [email protected]
[email protected]
