०९ जुलै २०२१
Home
चंद्रपूर
जिल्हा रूग्णालयाततील सफाई कर्मचारी राहून सुधाकर नन्हेट या कोरोना योद्धाला महाराष्ट्रातील सर्वोच्च सन्मान द्या
जिल्हा रूग्णालयाततील सफाई कर्मचारी राहून सुधाकर नन्हेट या कोरोना योद्धाला महाराष्ट्रातील सर्वोच्च सन्मान द्या
*भारतीय सुदर्शन समाज महासंघाची मागणी
शिरीष उगे (प्रतिनिधी भद्रावती/वरोरा)
:- चंद्रपूर शहर जिल्हा रूग्णालयात सफाईचे काम करणार्या मात्र 24 वर्षीय राहूल सुधाकर नन्हेट ज्याला कोरोना रूग्णाची सेवा करत असताना कोरोना बाधित झाला व त्याचे २१ एप्रिल २०२१ रोजी त्यांचे निधन झाले. एवढेच नाही तर राहुलची आई आपल्या मुलाच्या मृत्यूच्या दोन दिवसानंतर म्हणजेच 23 एप्रिल 2021 रोजी तिचा मृत्यू कोरोनामुळेच झाले राहुल चे बाबा दोन वर्षा पूर्वी आजाराने मृत्यू झाली होती तो आपल्या वडिला च्या जागेवर वारसान पद्धतीने नौकरी वर लागला होता त्याला नौकरी मिळून फक्त एक वर्ष झाले होते परंतु कोरोना मुळे त्याचे व त्याची आई दोघांचे मृत्यू झाले.
या कोरोना योद्धाला त्याच्या मृत्यू नंतर महाराष्ट्राचा सर्वोच्च सन्मान कोरोना योद्धा म्हणून सम्मानीत करण्यात यावा अशी मागणी भारतीय सुदर्शन समाज महासंघाने केली असून या संदर्भात महाराष्ट्र चे मुख्यमंत्री आरोग्य मंत्री, सामाजिक न्याय मंत्री चंद्रपूर जिल्ह्यातील पालकमंत्री माजी वित्त मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, आमदार किशोरभाऊ जोरगेवार जिल्हाधिकारी आणि मुख्य शल्य चिकित्सक ला निवेदन देण्यात आले.
डॉक्टर, परिचारिका, सफाई कर्मचारी आणि पॅरामेडीक्सच्या गटांना हा सन्मान मिळायला हवा अनेक डॉक्टर, नर्स सफाई कामगार कोरोनाशी झुंज देत आपले प्राण गमावले. जर आपण त्यांचा महाराष्ट्राचा सर्वोच्च सन्मान कोरोना योद्धा देऊन सन्मान केला तर ही त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. लाखो डॉक्टर, परिचारिका आणि सफाई कामगारांनी त्यांचे जीवन व कुटूंबाची पर्वा न करता नि: स्वार्थपणे लोकांची सेवा करत आहे. त्याचे सन्मान करण्याचा आणि आभार म्हणण्याचा या सारखा आणखी दुसरा पर्याय नाही असे पत्र भारतीय सुदर्शन समाज महासंघ चे प्रदेश महामंत्री मनोज खोटे आणि संघटन मंत्री राजेश रेवते यांनी दिले आहे.
खबरबात
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.
- प्रकाशक
ईमेल [email protected]
[email protected]
