शरद पवारांचा जबरया चाहता : पाठीवर गोंदवुन घेतला साहेबांचा टॅटू - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत१२ जुलै २०२१

शरद पवारांचा जबरया चाहता : पाठीवर गोंदवुन घेतला साहेबांचा टॅटू

 

शरद पवारांचा जबरया चाहता : पाठीवर गोंदवुन घेतला साहेबांचा टॅटू

आपण बरयाच जणांच्या हातावर,पायावर नावाचा,देवाचा किंवा चिन्हाचा टॅटु काढलेला पाहिलेला असेल.

शरद पवारांचा जबरया चाहता: पाठीवर गोंदवुन घेतला साहेबांचा टॅटू

अभिनेत्याचे टॅटु सुध्दा काढणारे चाहते आहेत.
पण बारामतीच्या अक्षय साळवे याने,महाराष्ट्राचे पॉवरफुल नेते शरद पवार यांचा टॅटु आपल्या पाठीवर काढुन घेतला आहे.विशेष म्हणजे हा टॅटू पर्मनंट म्हणजेच कायमस्वरुपी आहे. शरद पवारांची साताऱ्यातील पावसातील सभा प्रचंड गाजली होती. त्याच वेळी अक्षयने मुंबईत हा टॅटू काढून घेतला होता.


आपल्या पाठीवरील हा टॅटू खुद्द शरद पवार यांनी पाहावी, अशी अक्षयची मनापासून इच्छा होती. अखेर रविवारी( दि ११ जुलै २०२१) ही संधी चालून आली. अक्षयने शरद पवारांची काल भेट घेतली आणि आपल्या पाठीवर काढलेला टॅटू दाखवला. यावेळी शरद पवारांनीही अक्षयचे कौतुक केले.
शरद पवारांना सुध्दा आपला जबरदस्त फॅन पाहून सुखद धक्का बसला.
अक्षय साळवे हा बारामती तालुक्यातील मेदड येथील असुन लहानपणापासून शरद पवारांना आपला नेता मानतो.या प्रेमापोटी त्यांने आपल्या संपुर्ण पाठीवर शरद पवारांचा कायमस्वरूपी टॅटु काढुन घेतला आहे.. तो सध्या मुंबईत व्यवसायानिमित्त स्थायिक झालेला आहे
.