शिवसेनेचे दिवाकर पाटणे जि.प. निवडणूकीच्या रिंगणात - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


०८ जुलै २०२१

शिवसेनेचे दिवाकर पाटणे जि.प. निवडणूकीच्या रिंगणात


शिवसेनेचे दिवाकर पाटणे जि.प. निवडणूकीच्या रिंगणात
गोधणी ( रेल्वे ) जि.प. मध्ये त्रिकोणी मुकाबला होणार
नागपूर / अरुण कराळे ( खबरबात )
जिल्हा परिषद गोधनी सर्कल पोटनिवडणुकीत शिवसेनेचे हिंगणा विधानसभा संपर्क प्रमुख दिवाकर पाटणे यांनी नागपूर तहसील कार्यालयात निवडणूकीचा अर्ज सादर केल्यामुळे गोधणी (रेल्वे ) जि.प. सर्कल मध्ये त्रिकोणी मुकाबला पहायला मिळणार आहे. कॉंग्रेसतर्फे कुंदा राऊत , भाजपातर्फे विजय राऊत आणि शिवसेनेचे दिवाकर पाटणे यांच्यात त्रिकोणी मुकाबला होणार आहे. दिवाकर पाटणे यांचे गोधनी भागात चांगला दांडगा संपर्क आहेत. व्यक्तिशः दिवाकर पाटणे येथून चांगले मते गोळा करतील असे जाणकाराचे मत आहे.
राज्यात काँग्रेस , शिवसेना व राष्ट्रवादी यांची युती असुनही जिल्हा परिषद सर्कल मध्ये कॉंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येवून लढत आहे. शिवसेनेने मात्र एकला चलोचा नारा देऊन हम भी कुछ कम नही है, हे दाखवून दिले. सर्वसामान्य जनता आता शिवसेनेला पसंती देईल असे वाटत आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामावर जनता खूष आहेत. शिवसेना प्रेरीत युवासेना, शिव वाहतुक सेना , व्यापारी सेना यांच्या प्रमुख नेत्यांनी व कार्यकर्त्यानी इमानेइतबारे दिवाकर पाटणे यांचा प्रचार केल्यास दिवाकर पाटणे भरपूर आघाडी घेऊ शकते. दिवाकर पाटणे यांनी गोधणी जि.प. च्या निवडणूकीत अर्ज सादर केल्याचे परिसरातील नागरीकांना समजताच नागरीक दिवाकर पाटणे यांना प्रत्यक्ष भेटून आमच्या समस्या तुम्ही सोडवू शकता ?मागे निवडून दिलेल्या उमेदवारासारखे आम्हाला वाऱ्यावर सोडू नका .तुमचे साहेब मुख्यमंत्री आहेत ,तुम्हीच आम्हाला पदरात घ्या. अशी विनवणी करुन आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे सांगितले.लॉकडाऊन काळात राज्यातील अनेक कंपन्या बंद पडल्या होत्या . मोठय़ा प्रमाणावर नागरिक बेरोजगार झाले होते. बरेचशे नागरिक कंपनी सोडून आपल्या मूळ गावी परत गेले. हाताला काम नसल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती. त्यावेळी येरला येथील फ्लिपकार्ट कंपनीने स्थानिक तरुणांना डावलून परप्रांतीय नागरिकांना रोजगार उपलब्ध करून दिल्याची माहिती शिवसेनेचे हिंगणा विधानसभा सहसंपर्क प्रमुख दिवाकर पाटणे यांना मिळताच शिवसेना तालुका प्रमुख संजय अनासाने, विभाग प्रमुख नरेश मसराम,उपतालुका प्रमुख अमोल कुरळकर, मनीषा लकडे, रार्जशी उपाध्याय, कविता वैद्य, कैलाश मालवे यांना घेऊन येरला येथील फ्लिपकार्ट कंपनीचे व्यवस्थापक सांदिपनी प्रताप सिंह पवार यांना भेटून एक निवेदन सादर केले. स्थानिक बेरोजगार तरुणांना रोजगार देण्याची मागणी केली. असे विविध कार्यक्रम राबवून स्थानीक नागरीकांना कामे दिली. त्यामुळे स्थानिक नागरीक दिवाकर पाटणे यांना भरभरून मते देणार असल्याचे शिवसेना वाडी शहर प्रमुख मधू माणके पाटील यांनी केले आहे.