दूरदर्शनच्या मोर्शी आणि तुमसर येथील लघु प्रक्षेपण केंद्राच्या क्षेत्रीय सेवा बंद - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

२७ जुलै २०२१

दूरदर्शनच्या मोर्शी आणि तुमसर येथील लघु प्रक्षेपण केंद्राच्या क्षेत्रीय सेवा बंद

 रदर्शनच्या   मोर्शी आणि तुमसर  येथील लघु प्रक्षेपण केंद्राच्या  क्षेत्रीय सेवा  बंद  

 

नागपूर 26  जुलै  2021  

  दूरदर्शनच्या अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथील लघु प्रक्षेपण केंद्र (एल.पी.टी.)  आणि  भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील लघु प्रक्षेपण केंद्र यांच्या  क्षेत्रीय सेवा 23 जुलै च्या मध्यरात्रीपासून बंद झाल्या आहेत . मोर्शी एलपीटीच्या 203 पुर्णांक 25 मेगाहर्टज वरील वाहिनी क्रमांक 9   आणि तुमसरच्या 196 पुर्णांक 25 मेगाहर्टजची वाहिनी क्रमांक 8 वर आता दुरदर्शनचे प्रसारण दिसणार नाही.      

प्रसार भारती मंडळ तसेच दूरदर्शन महासंचालनालय,  नवी दिल्लीच्या आदेशानुसार या लघु प्रक्षेपण केंद्राच्या क्षेत्रीय सेवा बंद करण्यात आल्याचे नागपूर दूरदर्शन केंद्राचे अभियांत्रिकी  उपसंचालक  भुपेंद्र तुरकर यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे. 


 

Page navigation