मुलाकडून आई बहिणीला जीवे मारण्याची धमकी मालमत्तेचा वाद. पत्रपरिषदेत माहिती - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


०९ जुलै २०२१

मुलाकडून आई बहिणीला जीवे मारण्याची धमकी मालमत्तेचा वाद. पत्रपरिषदेत माहिती

शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी)
:आईला तिच्या वडीलाकडून मिळालेल्या जागेची विक्री केल्यानंतर येणारी सर्वच रक्कम आपल्याला मिळावी बहिणीला काही देऊ नये यासाठी मुलाने आईचा व आपल्या दोन बहिणीला जीवे मारण्याची धमकी देत असल्याबाबत ची माहिती शांती चौबे यांनी पत्रकार परिषदेत दिली
नवीन बस स्थानक लगत असलेल्या संयोग लाज हे सर्वे नंबर 106 मधील प्लॉट क्रमांक सात वर आहे तो प्लॉट माझ्या मालकीचा असून त्यावरील इमारत ही माझ्याच मालकीची आहे.ही सर्व मालमत्ता मला माझ्या वडिलांनी आपल्या पैशातून मला घेऊन दिली माझा मुलगा संयोग याच्या भविष्याचा मी विचार केला होता परंतु तो वाईट वळणाला लागल्याने हा विचार सोडून द्यावा लागला. माझ्या पतीच्या निधनानंतर सहयोग करीत असलेल्या मारहाणीमुळे मला नागपूर येथे मुलीकडे राहावे लागत आहे. 
 मुलाकडून होणारा सततचा त्रास बघता व माझी प्रकृती ठीक नसल्याने ही मालमत्ता विक्रीस काढून याचा समान चार भागात वाटा करण्याचे ठरविले व त्या मालमत्तेची मी विक्री केली.  विक्री केल्यानंतर सहयोग हा बदलला असून विक्री चा संपूर्ण पैसा मला द्या असे म्हणून तो सतत धमकावत असल्याची माहिती शांती चौबे यांनी पत्रकार परिषदेत सांगितली
 सदर प्लॉटची विक्री दिनांक 17 जून 2021 ला आशिष तांडेकर याला करून दिली विक्रीनंतर त्याचा ताबा सुद्धा तांडेकर यांना देण्यात आला.  नंतर त्यांनी या परिसरात कॅमेरे लावले आणि इतर काम सुरू केले परंतु मुलगा सहयोग याने तेथील सीसीटीव्ही कॅमेरे काढून परिसरात गैरमार्गाने प्रवेश करुन नुकसान केले याबाबतची तक्रार सुद्धा भद्रावती पोलिसात करण्यात  आली आहे. पोलीस प्रशासन आपल्याला न्याय मिळवून द्यावा असे आई शांती चौबे बहिण सरस्वती पांडे राजलक्ष्मी पाठक आशिष तांडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.