दुचाकी चोरी प्रकरणात चोरटे पोलिसांच्या ताब्यात - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


०३ जुलै २०२१

दुचाकी चोरी प्रकरणात चोरटे पोलिसांच्या ताब्यातशिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) 
: भद्रावती पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचे ४ गुन्ह्याची नोंद असताना त्या तपासा अंतर्गत दि. २ जून ला गुन्हे शोध पथकाला मिडालेल्या माहितीच्या आधारे काही दिवसापूर्वी पंचशील वार्डातील चोरी गेलेली दुचाकी हि आरोपी प्रशांत मलिक वय- १९ रा फुकट नगर याने केली आहे. या दुचाकीच्या शोधमोहिमेत आरोपीला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता चौकशीत सदर त्याचेंच मित्र आरोपीचा समावेश आहे. त्यात रितिका जांभुळकर वय २१ रा डोलारा वार्ड, प्रज्वल बुराणकर वय १९ रा फुकट नगर, विधीसंघर्ष बालक रोहन सोळंके वय १७ रा  फुकट नगर, प्रशांत ताटेवार वय १७ फुकट नगर सर्व रा भद्रावती असून यांनी  दुचाकी क्र,एम एच ३४ बी जे ६४३८ किंमत २५ हजार,  दुचाकी क्र,एम एच ३२ एन ७७५३ किंमत ३० हजार, दुचाकी क्र,एम एच ३४ बी इ  ९१४३ किंमत ७० हजार आणि दुचाकी क्र,एम एच ३४ ए डब्लू ६१८१ किंमत २५ हजार असून आरोपीना ताब्यात घेतले आहे. सदर गुन्ह्यात चोरी गेलेली  ४ दुचाकी यांची एकूण अंदाजे किंमत १ लाख ५० हजार  जप्त करण्यात आले आहे.   
सदरची कारवाही पोलीस अधीक्षक अरविंद साळवे सा , अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उप. वि. पोलीस अधिकारी निलेश पांडे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक  सुनीलसिंग पवार, गुन्हे शोध पथकातील पो .उप. नि. अमोल तुळजेवार, पो.शी. केशव चिटगिरे, पोशी सचिन गुरनुले, पोशी हेमराज प्रधान, पोशी शशांक बदामवर यांनी केलेली आहे.