डिफेन्सच्या तलावात इसमाची आत्महत्या - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत१७ जुलै २०२१

डिफेन्सच्या तलावात इसमाची आत्महत्या


डिफेन्सच्या तलावात इसमाची आत्महत्या
नागपूर / अरुण कराळे( खबरबात )
गांजाच्या आहारी जाऊन मानसिक स्थिती बिघडलेल्या ५५ वर्षीय अरुण भिवनकर यांनी डिफेन्स अंबाझरी तलावात आत्महत्या केलेली घटना वाडी पोलीस स्टेशन हद्दीत घडली. पोलीस सूत्राच्या माहितीनुसार सोनेगांव ( निपाणी ) येथील निवासी मृतक अरुण प्रभाकर भिवनकर वय ५५ वर्ष हा अनेक दिवसांपासून गांजाच्या व्यसनाधीन झाल्याने त्याची मानसिक स्थिती ढासळलेली होती. गुरुवार १५ जुलै रोजी घरी कुणालाही न सांगता निघून गेला,बराच वेळ होऊनही अरुण घरी न परतल्याने घरच्यांनी इतरत्र शोधाशोध केली परंतु शोध लागला नाही दुसऱ्या दिवशी शुक्रवार १६ जुलै रोजी सकाळी ८ वाजता डिफेन्स येथील तलावाजवळ लोकांची गर्दी झाली होती मृतकाच्या भावाने जाऊन पाहले असता अरूणचा मृतदेह वर तरंगलेला दिसला. फिर्यादीच्या तक्रारीवरून वाडी पोलिसांनी मर्ग दाखल करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मेयो हॉस्पिटलमध्ये पाठवले असून पुढील तपास सुरू आहे.