१० जुलै २०२१
शिक्षकांची सुमारे ६१०० रिक्त पदं भरणार..!
सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय..!
स्थानिक स्वराज्य संस्था/खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, अंशतः व विनाअनुदानित, अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांतील, शासकीय व अनुदानित अध्यापक पदविका विद्यालयातील (डी.एल.एड.कॉलेज) शिक्षकांची सुमारे ६१०० रिक्त पदं भरणार..!
विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर (प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक)
*शिक्षण सेवक भरतीला हिरवा कंदील सुमारे सहा हजार पदे भरणार*
👉 राज्यातील सुमारे सहा हजार 100 शिक्षण शिक्षण सेवकांची पदे आता भरली जाणार आहे. गुणवत्ताधारक उमेदवारांसाठी पवित्र प्रणालीच्या माध्यमातून पारदर्शकपणे ही प्रक्रिया राबवण्यात येणार आहेत राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित अंशत: अनुदानित व विना अनुदानित तसेच अनुदानास पात्र घोषीत केलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक ,माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील तसेच शासकीय व अनुदानित अध्यापक पदविका विद्यालयातील (डी.एल.एड.काॅलेज) शिक्षकांच्या रिक्त पदावर भरती करताना सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी मिळावी व शिक्षण सेवक पदासाठी उच्चगुणवत्ता धारक उमेदवारांची निवड होण्याच्या दृष्टीने शिक्षण सेवकांची भरती *अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी* परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे तसेच खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये *अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी* परीक्षेत उच्चतम गुण मिळवणाऱ्या उमेदवारांची मुलाखत घेऊन त्या आधारे अंतिम निवड करण्यात येणार आहे.
डिसेंबर 2017 मध्ये आयोजित केलेल्या अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेतील गुणांच्या आधारे पवित्र प्रणालीच्या माध्यमातून सुमारे 12 हजार 70 शिक्षक सेवक पदाकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे आतापर्यंत 1970 शिक्षण सेवक पदांवर नियुक्त्या देण्याबाबतची प्रक्रिया यापूर्वी फेब्रुवारी 2020 मध्ये पूर्ण झाली आहे.
Covid-19 च्या प्रादुर्भावामुळे सार्वजनिक आरोग्य वैद्यकीय शिक्षण विभागाकडील पदभरती वगळता अन्य विभागाने नवीन पदभरती करू नये असे वित्त विभागाच्या शासन निर्णयन्वे निर्देश असल्याने ही भरती प्रक्रिया प्रलंबित ठेवण्यात आली होती मात्र शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पदभरती बंदीतून पवित्र प्रणालीद्वारे सुरु असलेली शिक्षण सेवक पद भरती प्रक्रिया वगळण्यात यावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्याने शिक्षण सेवक भरतीच्या मार्ग मोकळा झाला आहे.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर (प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक)*
खबरबात
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.
- प्रकाशक
ईमेल [email protected]
[email protected]
