अजित पवार यांना भारतीय प्रशासकीय सेवेत पदोन्नती Ajit Pawar promoted to Indian Administrative Service - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

बुधवार, जुलै १४, २०२१

अजित पवार यांना भारतीय प्रशासकीय सेवेत पदोन्नती Ajit Pawar promoted to Indian Administrative Service

राज्य नागरी सेवेतून (एमपीएससी) भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये (आयएएस) पदोन्नती मिळण्यासाठी अधिकाऱ्यांना पंचवीस वर्षांच्या सेवेची प्रतीक्षा करावी लागते. नंतर महाराष्ट्रात भारतीय प्रशासन सेवेमध्ये पदोन्नती दिली जाते. राज्यात भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांचे संख्याबळ मोठे आहे. सध्या विविध विभागात यूपीएससीमधून निवड झालेले अधिकारी कार्यरत आहेत. राज्य नागरी सेवेतील अधिकाऱ्यांना भारतीय प्रशासन सेवेमध्ये सामावून घेण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोग आणि मुख्यमंत्री यांची एक बैठक होत असते. या बैठकीमध्ये पंचवीस वर्षे सेवेचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या राज्य नागरी सेवेतील अधिकाऱ्यांना भारतीय प्रशासन सेवेत नियुक्ती देण्यात येते.

राज्याच्या महसूल विभागातील अप्पर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकारी अजित पवार यांची भारतीय प्रशासकीय सेवेत नियुक्ती करण्यात आली आहे. श्री अजित पवार हे वर्ष 2003 ते 2008 पर्यंत चंद्रपूरचे उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत होते.

सध्या ते पुण्यात रुजु आहेत. आणि पुण्यातील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष असून, त्यांच्याकडे पुणे, कोल्हापूर, सातारा या तीन जिल्ह्याची जात वैधता पडताळणी ची जबाबदारी आहे. 2003 ते 2008 पर्यंत चंद्रपूरचे उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. तेव्हा तत्कालीन जिल्हाधिकारी संजीव जयस्वाल, पोलीस अधिक्षक अब्दुर रहमान यांचा सोबत शहरात अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली. महाकाली मंदिरात भाविकांच्या सोई साठी दुसऱ्या दाराची सोय करुन दिली. क्रीडा क्षेत्रात विशेष रुची होती. स्टेडियमच्या सोयी सुविधा वाढविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. स्वतः वॉलीबाल प्लेयर होते. चंद्रपूर मध्ये उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत असतांना एक वेळ अशी आली होती की त्यांना चंद्रपूर सोबतच ब्रम्हपुरी व राजुरा या तीन ठिकाणचा प्रभार देण्यात आला होता आणि तो व्यवस्थित पार पडला. अत्यंत मनमिळावू, सर्वसामान्य जनता व गोर गरीबांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणारा अधिकारी म्हणून ओळख निर्माण केली. आता त्यांची राज्याच्या महसूल खात्यातून भारतीय प्रशासकीय सेवेत पदोन्नती करण्यात आली आहे.