धक्कदायक : चंद्रपूरात युवकाची धारदार शस्त्राने हत्या - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२९ जुलै २०२१

धक्कदायक : चंद्रपूरात युवकाची धारदार शस्त्राने हत्या

 चंद्रपूर(खबरबात):
चंद्रपुरातील बल्लारपुरात आणखी एका युवकाची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास घडली आहे.बल्लारपूर शहरातील सास्ती पुलिया खाली मारोती उर्फ विक्की शंकर काकडे या वेकोली कामगाराचा  गळा चिरलेल्या अवस्थेत शव आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. 
या घटनेची माहिती बल्लारपुर पोलिसांना मिळताच घटनास्थळ गाठून तपास सुरु केला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. तसेच शव शवविच्छेदनासाठी बल्लारपुर ग्रामीण रुग्णालयात पाठवले.
दिवसेंदिवस बल्लारपुरातील  शांतता भंग होत असल्याचे काही दिवसापासून दिसून येत आहे.गेल्या काही दिवसापूर्वी वराह पकडण्याच्या क्षुल्लक कारणावरून डॉ. आंबेडकर वार्ड परिसरात एकाची हत्या झाली होती, तर महाराणा प्रताप वॉर्ड परिसरात 4 ते 5 व्यक्तींनी एका व्यक्तीवर धारदार शस्त्राने हल्ला केला होता.सुदैवाने बल्लारपूर पोलीस दाखल झाल्याने व वेळेवर उपचार मिळाल्यामुळे त्या तरुणाचे प्राण वाचले, मात्र आज शहरात पुन्हा एकदा एका युवकावर धारदार शस्त्राने वार करत गळा चिरून हत्या करण्यात आली. त्यामुळे शहरात पुन्हा भाईगिरीचे प्रस्थ वाढत चालले की काय?असा प्रश्न उपस्थित होत आहे. या घटनेनंतर बल्लारपुरात लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचा पुढील तपास बल्लारपुर पोलीस करीत आहे.