किराणा गोडावूनमधून चोरट्याने चोरले चक्क "पारलेजी" - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२१ जुलै २०२१

किराणा गोडावूनमधून चोरट्याने चोरले चक्क "पारलेजी"


किराणा गोडाऊन मधून 91 हजार रुपयांचा किराणा चोरी

शिरीष उगे (भद्रावती/प्रतिनिधी)
: येथील एका किराणा दुकानाच्या गोडाऊन मधून अज्ञात चोरट्यांनी 91 हजार तीनशे रुपयाच्या माल चोरून नेल्याने शहरात खळबळ माजली असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. भद्रावती शहरातील मंजुषा लेआऊट येथील रहिवासी अमोल उपगन्नावार यांचा किराणा वस्तूच्या व्यवसाय आहे. त्यांचे गजानन महाराज प्रवेशद्वाराजवळ परिश्रम किराणा स्टोअर्स नावाचे दुकान आहे. या किराणा दुकान जवळच व्यवसायी चेतन गुंडावार यांच्या घरासमोर उपगन्नावार यांचे गोडाऊन आहे. दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या गोडाऊन चा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. दरम्यान 63 हजार रुपये किमतीचे स्नेहा कंपनीचे 15 लिटरचे 30 पिपे, 27 हजार रुपये किमतीचे स्नेहा कंपनीचे एक लिटर चे 12 पॉकेट असलेले 15 खड्ड्याचे बॉक्स ,आणि पार्लेजी बिस्कीट च्या दोन पेट्या असा एकूण 91 हजार चोरट्यांनी लंपास केला गुंडावार यांच्या गोडाऊन चा दरवाजा उघडा दिसला . त्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. भद्रावती पोलिसात तक्रार दाखल केली. असून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.