येरंडी येथील 55 वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

मंगळवार, जुलै ०६, २०२१

येरंडी येथील 55 वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या

येरंडी येथील 55 वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या

आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात?

संजीव बडोले प्रतिनिधी.

नवेगावबांध ता.६.

आज ६ जुलै रोज मंगळवार ला देवलगाव-येरंडी जंगल परिसरात गाई ढूरे राखावयाला गेलेल्या गुराख्याला एक इसम एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. सदर आत्महत्या करणारा इसम यशवंत बारकू राऊत वय ५५ वर्षे राहणार एरंडी देवलगाव असल्याची खात्री पोलिसांनी पटवली. एरंडी येथील काही गुराखी जंगलात गुरे ढोरे चारावयाला आज तारीख सहा ला गेले असता, दुपारी १२ ते १ वाजेच्या दरम्यान येरंडी देवलगाव येथील एक इसम झाडाला फाशी लागलेल्या अवस्थेत त्यांना दिसले. याबाबतची माहिती गावात दिली. गावकऱ्यांनी सदर माहिती पोलीस स्टेशन नवेगावबांध येथे दिली. घटनेची माहिती मिळताच नवेगावबांध पोलिस ठाण्याचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन हेगडकर आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले .घटनास्थळी भेट देऊन प्रथमदर्शनी पाहणी केली. त्यात पोलिसांना आक्षेपार्ह काहीही दिसले नाही.
पोलिसांनी पोलीस पाटील देवलगाव व पोलीस पाटील येरंडी देवलगाव यांना व इतर ग्रामस्थांना बोलावून ओळख पटविली असता, सदर गळफास घेऊन मयत झालेल्या इसमाचे नाव यशवंत बारकू राऊत वय-५५ वर्षे राहणार येरंडी देवलगाव येथील असल्याचे समजले. सदर शेतकऱ्यांनी आत्महत्या का केली? हे कळू शकले नाही. मृतकाच्या मागे पत्नी सुमित्रा, मुकेश, मिथुन हे दोन मुले आहेत.ग्रामीण रुग्णालय नवेगावबांध येथे शवविच्छेदनानंतर मृतकाचे प्रेत कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. नवेगावबांध पोलीस ठाण्याचे ठाणेदार पोलीस निरीक्षक जनार्दन हेगडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशपाक शेख पुढील तपास करीत आहेत.