चंद्रपूर शहरात दहशत माजविण्याचा प्रयत्न : 2 आरोपींना तलवारीसह अटक | - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

३० जुलै २०२१

चंद्रपूर शहरात दहशत माजविण्याचा प्रयत्न : 2 आरोपींना तलवारीसह अटक |

चंद्रपूर : शहरात दहशत माजविण्याच्या प्रयत्नात असलेल्या 2 आरोपींना तलवारीसह शहर पोलिसांनी आज शुक्रवारी अटक केली आहे.तर दोन आरोपी फरार झाले आहेत.शुभम येनगंटीवार, साहिल शेख असे अटकेतील आरोपींची नाव आहे.तर सुशांत वाजपेयी, अविनाश पडोले हे दोघे फरार असून त्यांचा Chandrapur district Police Station  शहर पोलीस शोध घेत आहेत.

युवकांनी चंद्रपुरात गोळीबार केल्यावर शहरात आता भाईगिरी करणाऱ्या युवकांची संख्या वाढत आहे. सध्या हातात तलवारी घेऊन नागरिकांमध्ये दहशत पसरविण्याची या युवकांची फॅशन बनली आहे. यामधील काही युवक पोलिसांच्या रेकॉर्डवरील व काही नवखे आहे.चंद्रपूर शहरातील तरुण-तरुणींचे फिरण्याचं स्थान म्हणजे शहरातील रामाला तलाव चौपाटी परिसर... या रहदारीच्या मार्गावर काही युवक चारचाकी वाहनात शस्त्रे घेऊन दहशत माजविण्याच्या प्रयत्नात होते.दरम्यान या घटनेची माहिती शहर पोलीस पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक सुधाकर अंभोरे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे अन्वेषण विभागाचे वाघमारे व कोरडे यांनी घटनास्थळी दाखल होऊन 2 कोयते व 1 तलवार जप्त करीत 2 युवकांना ताब्यात घेतले मात्र 2 युवक पळण्यात यशस्वी झाले.पोलिसांच्या सतर्कतेने मोठी घटना होता होता टळली असून फरार दोन आरोपींचा शोध पोलिसांनी Chandrapur district Police Station  सुरु केला आहे.
पेज नेव्हिगेशन