कोविड-19 मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी युध्द पातळीवर प्रयत्न | Dr. rajesh Deshmukh - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

३० जुलै २०२१

कोविड-19 मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी युध्द पातळीवर प्रयत्न | Dr. rajesh Deshmukh

 

                         -जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख


बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी जिल्हास्तरीय कृतीदलाची (टास्क फोर्स) बैठक संपन्न


पुणे, दि. 29 : कोविड-19 मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी जिल्ह्यातील संबंधीत सर्व शासकिय यंत्रणांनी विशेष प्रयत्न करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.

बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी जिल्हास्तरीय कृतीदलाची (टास्क फोर्स) बैठक जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. त्यावेळी डॉ. राजेश देशमुख बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अश्विनी कांबळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी परम आनंद व कृती दलाचे सदस्य उपस्थित होते.


जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले कोविड-19 मुळे ज्या बालकांचे दोन्ही पालक गमावले आहेत असे कोणतेही बालक शिक्षणापासुन वंचित राहू नये शिक्षणाधिकारी यांनी यासाठी सर्व तालुका स्तरावर बालकांची माहिती संकलित करुन त्यांना सर्व शैक्षणिक सोयी सुविधा देण्यासाठी युध्द पातळीवर काम करावे. तसेच पालक त्याची शाळेची फीस भरण्यासं असक्षम असल्यास त्याबाबत महिला व बाल विकास विभाग विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे त्याकरीता शाळेकडून सहकार्य मिळणेसाठी शिक्षण विभाग यांनी समन्वय करण्याबाबत निर्देश दिले. तसेच ज्या बालकांचे दोन्ही पालक गमावले आहेत अशा बालकांचे समुपदेशन करण्यात यावे. शासकीस मदत मिळण्यासाठी दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची त्यांच्या घराजवळील बँकेत बँक खाते उघडण्यात यावे. त्याकारीता जिल्हा कार्यालायाकडून सबंधित बँक अधिकारी सूचना देण्यात यावे.  तसेच ज्या बालकांचे दोन्ही पालक दगावले आहेत अशा बालकांचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी त्वरित  कार्यवाही करण्यात यावी असे निर्देश दिले. 


कोविड-19 मुळे पतीचे निधन झालेल्या विधवा महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळण्यासाठी कार्यवाही करावी. जिल्ह्यात पालक गमावलेल्या सुमारे 1620 बालकांची नोंदणी ऑनलाईन पोर्टलवर झालेली असून अद्यापही काही बालकांची नोंदणी करण्याचे काम सुरु आहे. कोविड-19 मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची नावे त्याचप्रमाणे एक पालक कोरोनाने दगावल्याने संरक्षणाची गरज असलेले बालक व विधवा झालेल्या महिलांची नोंद वारसदार म्हणून लावण्यासाठी संबंधित शाखेमार्फत कार्यवाही करण्यात येत आहे. कोविड-19 मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना शैक्षणिकसह अन्य सर्व न्याय हक्क देण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे असे ही  डॉ. देशमुख सांगितले  . 

दहा वर्षाखालील ज्या बालकांचे दोन्ही पालक दगावले आहेत अशा बालकांचे पुनर्वसन करण्यासाठी Guardian(प्रतिपालकत्व ) करणे आवश्यक आहे त्याकरिता जिल्हा न्यायालय मार्फत प्रक्रिया करण्याबाबत  डाॅ. देशमुख  यांनी निर्देश दिले. त्याच बरोबर बालकांना त्यांच्या वारसा हक्क मिळवून देण्याबाबत तहसीलदार यांना निर्देश दिले.