मोठी बातमी । १५ जण विहिरीत कोसळले | - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१५ जुलै २०२१

मोठी बातमी । १५ जण विहिरीत कोसळले |


मध्य प्रदेश- विदिशातील गंजबसोडामध्ये १५ जण विहिरीत कोसळले; एनडीआरआफ, एसडीआरएफकडून बचावकार्य सुरू

मध्यप्रदेश राज्यातील विदिशा जिल्हामध्ये असलेल्या गंजबासौदा येथे मोठी दुर्घटना घडली आहे. शहरातील लाल पठार क्षेत्रांमध्ये जवळपास 15 व्यक्ती विहिरीत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. घटनेची माहिती कळताच जिल्हा प्रशासन घटनास्थळी दाखल झालेला आहे. बचाव दलाच्यामार्फतीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. राज्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चव्हाण यांनी तातडीने बचावकार्य करण्याची सूचना दिलेल्या आहेत. प्राप्त माहितीनुसार या विहिरी मध्ये एक मुलगी कोसळली होती. तिला वाचविण्यासाठी येथे उपस्थित असलेल्या नागरिकांची गर्दी होऊन एकाच वेळी 15 हून जास्त नागरिक विहिरीत कोसळल्याची माहिती प्राप्त झाली आहे.