नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 11 ऑगस्टला उमेदवारांनी प्रवेश पत्र डाऊनलोड करावे - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२५ जुलै २०२१

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 11 ऑगस्टला उमेदवारांनी प्रवेश पत्र डाऊनलोड करावे

 नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 11 ऑगस्टला उमेदवारांनी प्रवेश पत्र डाऊनलोड करावेसंजीव बडोले प्रतिनिधी .


नवेगावबांध ता.25 जुलै:-

शैक्षणिक सत्र 2021-22 करिता सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये स्थित  जवाहर नवोदय विद्यालयांच्या  इयत्ता सहावीतील  प्रवेशासाठी घेण्यात येणारी  “जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी (जेएनव्हीएसटी) -2021” सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी, 11 ऑगस्ट 2021रोजी पुन:नियोजित केली आहे.

गोंदिया जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत उमेदवारांनी त्यांनी निवड चाचणीच्या सुधारित वेळापत्रकानुसार प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्यावे व  ते प्रवेश पत्रात नमूद केलेल्या चाचणी परिक्षा केंद्रांवर घेऊन जावे. उमेदवारांना प्रवेश पत्रात दिलेल्या प्रमाणे सर्व कोविड प्रोटोकॉल मार्गदर्शक सूचनांचे अनुसरण करावे लागेल.असे आवाहन प्राचार्य,जवाहर नवोदय विद्यालय नवेगावबांध जिल्हा गोंदिया यांनी केले असूनअधिक माहितीसाठी ९४२३४२४३६९ या क्रमांकावर संपर्क साधावा.असेही कळविले आहे.