आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संस्कृती मंत्रालयाद्वारे योग आणि सांस्कृतिक कार्यक्रम - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२० जून २०२१

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संस्कृती मंत्रालयाद्वारे योग आणि सांस्कृतिक कार्यक्रमकेंद्रीय संस्कृती मंत्रालय, दिनांक 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करत असून यावर्षी 'योग-एक भारतीय वारसा या अभियानांतर्गत हा आंतरराष्ट्रीय योग दिन' साजरा करण्यात येत आहे.   जुने उच्च न्यायालय इमारत- नागपूर योग दिवस  साजरा केला जाईल आणि 45 मिनिटे योगाभ्यास त्यानंतर 30 मिनिटांचे सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी सादर करण्यात येतील.   नागपूर सर्कलअंतर्गत योग प्रशिक्षक सकाळी 7 ते सकाळी 7.30 या दरम्यान योग साधना सादर करतील आणि दक्षिण-मध्य विभाग सांस्कृतिक केंद्र,नागपूरद्वारे सकाळी 7.30 ते 8.15 पर्यंत,सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातील.