वीज पडल्याने दोघांचा मृत्यू - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत१० जून २०२१

वीज पडल्याने दोघांचा मृत्यू

 कुंभारकिन्ही, मोरगव्हान येथे वीज पडल्याने दोघांचा मृत्यू

दारव्हा  : तालुक्यातील कुंभारकीन्ही आणि मोरगव्हान येथे अंगावर विज कोसळल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवार ता १० जूनला दुपारी घडली. आकाश प्यारेलाल जाधव (३०) रा. कुंभारकीन्ही व अशोक रायसिंग राठोड रा. मोरगव्हान असे मृत्यू झालेल्यांचे नाव आहे.

कुंभारकीन्ही येथे गावातील शेतकरी गुलाब किसन चव्हाण यांच्या शेतात आकाश कामाला होता. शेतीचे काम सुरु असतांना दुपारी वीजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. त्याचवेळी अचानकपणे दुपारी ३ वाजता वीज आकाशच्या अंगावर कोसळली. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. तो विवाहित असून त्याच्या मागे मोठा आप्त परिवार आहे. तर मोरगव्हान येथील अशोक राठोड यांचा लाडखेड शिवारात दुपारी २ ते ३ वाजताच्या सुमारास अंगावर वीज कोसळल्याने मृत्यू झाला. दोघांकडेही शेतजमीन नसल्याने मजुरीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता.घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. संबंधित तलाठ्यांनी या घटनेचा अहवाल तहसीलदारांना दिला आहे.