वाडीत अवैध रेतीची वाहतूक - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

११ जून २०२१

वाडीत अवैध रेतीची वाहतूक

वाडीत अवैध रेतीची वाहतूक करणारा ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात
२५ लाख ५५ हजाराचा मुद्देमाल जप्त
नागपूर /अरुण कराळे ( खबरबात )
अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकाला वाडी पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली. प्राप्त पोलीस माहितीच्या सूत्रानुसार एम. एच.४० एके - ४९६८ या क्रमांकाच्या ट्रक मध्ये अवैध रेतीची वाहतूक करीत असल्याची माहीती वाडी पोलीसांना समजताच चालक श्रीकांत शंकरराव हिवरे वय ३४ वर्ष रा. सातनूर ता. सौन्सर ,जिल्हा छिंदवाडा मध्यप्रदेश याला ट्रक सहीत अटक केली. ट्रकचालक श्रीकांत हिवरे याने त्याचा मालक समीर समीम खान वय ३५ वर्ष रा. सटवा माता मंदिर सावनेर याचे सांगण्यावरून सावनेर वलनी खदान येथील रोहणा घाट येथून गौण खनिज रेती माल अंदाजे २२ हजार किलोग्राम अंदाजे ५५ हजार रुपयांचा माल शासनाची परवानगी न घेता स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी दोघांनीही संगनमत करून चोरून आणल्याने आरोपीला मुद्धेमालसह वाडी पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास ठाणेदार प्रदीप सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक अविनाश जायभाये, पोलीस कॉन्सटेबल सुनील मस्के,प्रदीप ढोके,हेमराज,सतीश,प्रमोद करीत आहे.