वरोरा तालुक्यात उमेद महिला आणि ग्राम पंचायत यांचे समन्वयाने लसीकरण मोहीम यशस्वी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत०४ जून २०२१

वरोरा तालुक्यात उमेद महिला आणि ग्राम पंचायत यांचे समन्वयाने लसीकरण मोहीम यशस्वीवरोरा तालुक्यातील पाच गावात उमेद महिला व ग्राम पंचायत यांचे संयुक्त सहभागाने लसीकरण मोहीम यशस्वी लसीकरणाची ग्रामीण भागात भीती असताना चंद्रपूर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांचे मार्गदर्शनात गावागावात कोरोना प्रतिबंध लसीकरण 100% व्हावे यासाठी पावले उचलण्यात आली. 

तालुक्यात गटविकास अधिकारी यांना निर्देश देऊन गावागावात चांगले काम करणाऱ्या उमेद अभियानाच्या महिला व तालुका स्तरावरील  कर्मचारी आणि ग्राम पंचायत यांची मदत घेऊन लसीकरण मोहीम यशस्वी करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार तालुक्यातील खेम जाई, येनसा, मोखला, सोई ट, एकर्जूना या पाच गावात दिनांक ३ जून २०२१ रोजी लसीकरण आयोजित करण्यात आले. मोहीम यशस्वी होण्यासाठी उमेद तालुका टीम  यांनी गट विकास अधिकारी वानखेडे यांचे मार्गदर्शनात पाचही गावात मोहीम राबवली.  त्यासाठी ग्रामपंचायत आणि उमेद ग्रामसंघ कॅडर यांच्या सभा, गृहभेटी इत्यादी माध्यमातून जनजागृती करण्यात आली. लसीकरण घेण्यासाठी इच्छुक असलेल्या लोकांची नावासह यादी तयार करण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या सहकार्याने सर्व गावात लसीकरण करण्यात आले. त्यामध्ये दिलेले उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण झालेले आहे. 

या मोहिमेत ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य प्रतिष्ठित व्यक्ती,ग्रामसेवक, आशा वर्कर, उमेद कॅडर, प्रभाग समन्वयक, तालुका व्यवस्थापक,तालुका अभियान व्यवस्थापक इत्यादीचा मोलाचं सहभाग आहे.