दोन लाख पन्नास हजाराचा देशी दारूसाठा जप्त दोन आरोपी अटकेत - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत१५ जून २०२१

दोन लाख पन्नास हजाराचा देशी दारूसाठा जप्त दोन आरोपी अटकेतखबरबात
शिरीष उगे/ भद्रावती
भद्रावती - वणी मार्गे चंद्रपूर कडे अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करीत असताना वाहनासह दोन आरोपींना ताब्यात घेतले ही कारवाई सोमवारला करण्यात आली.
अजय राजेंद्र राम वय 24, अंकित विकास खंडारे वय 26 दोन्ही राहणार नवीन माजरी असे आरोपीचे नाव आहे हे वाहन क्रमांक 30 ए झेड 22 64 या वाहनाने वनी हुन भद्रावती मार्गे चंद्रपूर कडे दारूची वाहतूक करत असल्या बाबतची गुप्त माहिती भद्रावती पोलिसांना मिळाली त्याआधारे घोडपेठ परिसरात नाकाबंदी केली असता वाहनासह आरोपींना ताब्यात घेतले पन्नास हजाराचा दारू साठा व मुद्देमाल असा एकूण दहा लाख पन्नास हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई ठाणेदार सुनील सिंग पवार यांच्या मार्गदर्शनात गुन्हे अन्वेषण विभाग प्रमुख अमोल तुळजेवार, केशव चीटगिरे, हेमराज प्रधान ,शशांक बदामवार यांनी केली.