रानटी डुकराच्या हल्ल्यात दोन इसम जखमी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत१२ जून २०२१

रानटी डुकराच्या हल्ल्यात दोन इसम जखमीशिरीष उगे (खबरबात/भद्रावती) : तालुक्यातील विस्लोन व कुचना येथे राहणाऱ्या दोन इसमाला रानटी डुक्करानी हल्ला करून जखमी केल्याची घटना शनिवार च्या पहाटे दरम्यान घडली.
यातील प्रशांत प्रभाकर तुरांकर वय 43 राहणार विस्लोन व सतीश महादेव तिखट राहणार कुसना असे जखमी झालेल्या इसमाचे नाव आहे . प्रशांत हा गुरे घेऊन गेला होता तर सतीश शेताकडे जात असताना रानडुकरांनी हल्ला करून त्यांना जखमी केले रुग्णाला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी शेंडे यांनी घटनास्थळाची पाहणी केली.