खाजगी ट्राईव्हल्स ची दुचाकीला धडक; दोन जखमी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

१८ जून २०२१

खाजगी ट्राईव्हल्स ची दुचाकीला धडक; दोन जखमीशिरीष उगे भद्रावती (प्रतिनिधी)
: नागपुर चंद्रपुर मुख्य मार्गावरील मानोरा फाट्याजवळ खाजगी डि एन आर ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक दिल्याने दोघेजण जखमी झाल्याची घटना आज सकाळी अकरा दरम्यान घडली
संदीप दादाजी डाहुले वय 38 राहणार किल्ला वार्ड आणि लक्ष्मीकांत मुरलीधर भागडकर वय 32 राहणार किल्ला वार्ड भद्रावती हे दोघे जखमी झाले असून आपल्या बजाज पल्सर दुचाकीने मानोरा फाट्याजवळ येत असताना नागपूर मार्गे पुणे चंद्रपूर मार्गावर धावणारी चंद्रपूरच्या दिशेने भरधाव वेगाने येणारी डी एन आर खासगी ट्रॅव्हल्स क्रमांक एम एच 34 बी एच 8177 येत असतांना बजाज पल्सर दुचाकीला धडक दिल्याने दोघे जण जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.