मोबाईल बंद होताच अतुल कोल्हेच्या मदतीने ट्रक चालकाचा प्रवास झाला पूर्ववत - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत१५ जून २०२१

मोबाईल बंद होताच अतुल कोल्हेच्या मदतीने ट्रक चालकाचा प्रवास झाला पूर्ववतशिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी)
        : नागपूर - आंध्रप्रदेश कडे मालवाहू ट्रक जात असताना भद्रावती मुख्य मार्गावर त्याच्या मोबाईल मध्ये बिघाड आल्याने. त्याला ट्रक ची चाके भद्रावती तच थांबवावी लागली. त्याच्या मोबाईल मध्ये पेटीएम, नेट बँकिंग इत्यादी आर्थिक व्यवहाराची सुविधा असल्याने ट्रक मध्ये लागणारे इंधन तसेच इतर खर्च कसा होणार या चिंतेने त्याचा प्रवास भद्रावती परिसरात थांबला. मात्र सामाजिक कार्यकर्त्याच्या मदतीने त्याचा पुढील प्रवास पूर्ववत झाला.
रात्री आठच्या दरम्यान रामचंद्पुर या गावाहून आंध्रप्रदेश कडे जाणाऱ्या मालवाहू ट्रकचा चालक करिम मुल्ला च्या ट्रकचे इंधन कमी झाले होते तसेच त्याला आपल्या जेवणाची सुद्धा व्यवस्था करायची होती. त्यासाठी तो आपल्या मोबाईल मधून आर्थिक व्यवहार करीत होता. त्यातच त्याच्या मोबाईल मध्ये बिघाड आल्याने काम करीत नव्हता. त्या मोबाईल मध्ये पेटीएम नेट बँकिंग सारखी सुविधा उपलब्ध होती तो त्याचा पुरेपूर वापर करीत होता. परंतु आता मोबाईल मध्येच बिघाड आल्याने आपला पुढील प्रवास कसा होणार आपल्याजवळ पुरेसे पैसे नाही , माल वेळेत पोहोचणार कि नाही या चिंतेने तो ट्रकचालक अस्वस्थ झाला होता. अशातच या चालकाला येथील सामाजिक कार्यकर्ते अतुल कोल्हे दुचाकीने जाताना दिसले त्यांनी त्याला थांबविले सर्वप्रथम माझा मोबाईल दुरुस्त करून मिळणार काय असा त्यांनी प्रश्न केला . अतुल यांनी सांगितले की आमच्या जिल्ह्यातील बाजारपेठ सायंकाळी पाच वाजताच बंद होते आता काही तुम्हाला मोबाईल रिपेरिंग करून मिळणार नाही उद्या पहाटेच दुकान उघडल्यानंतर मोबाईल रिपेरिंग होईल. चालकाने मोबाईलवरच सर्व काही आर्थीक व्यवहार असल्याचे सांगितले .
त्या ट्रकचालकाचा केविलवाणा चेहरा बघता अतूल याला रहावले नाही त्यांनी त्या चालकाला स्वतःच्या दुचाकीवर बसवून मोबाईल रिपेरींग करण्याकरीता येथील गोलू गोहने ड्रीम मोबाईल शॉपी यांच्या घरी घेऊन गेला व मोबाईल रिपेरिंग करून देण्याची विनंती केली व त्यांनी सुद्धा रिपेरिंगचा एकही रुपया न घेता त्याचा मोबाइल दुरुस्त करून दिला तेव्हा तो ट्रकचालक चिंतादूर झाला व त्याने या दोघांचे मनापासून आभार मानले. त्याला रात्रभर भद्रावतीत न राहता पुढील आर्थिक व्यवहार करून आंध्र प्रदेश येथील मुधीयनपल्ली येथे वेळेत माल पोहोचविता आला.