म्हसवानी येथे जमीन विवादात एकाची हत्या तीन आरोपिंना अटक करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण ला यश - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत१७ जून २०२१

म्हसवानी येथे जमीन विवादात एकाची हत्या तीन आरोपिंना अटक करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण ला यश

 म्हसवानी येथे जमीन विवादात एकाची  हत्या 

तीन आरोपिंना अटक करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण ला यश
संजीव बडोले

जिल्हा प्रतिनिधी गोंदिया.


नवेगावबांध दि.17 जून:-

सडक अर्जुनी तालुक्यातील डुग्गीपार पोलीस स्टेशन अंतर्गत सडक अर्जुनी तालुक्यातील म्हसवानी येथील खुमराज बलीराम राहांगडाले यांची १३ जून ला सायंकाळी दरम्यान खोडशीवनी -म्हसवानी मार्गावर हत्या करण्यात आली.याप्रकरणात लोकल क्राइम ब्रांच ने  तीन दिवसांत आरोपींना  गिरफ्तार करून ताब्यात घेण्यात यश प्राप्त केले आहे.  डुग्गीपार पोलीस स्टेशन अंतर्गत १३ जून च्या सायंकाळ दरम्यान झालेल्या हत्येच्या प्रकरणात पोलिस अधीक्षक विश्व पानसरे,अप्पर पोलीस अधिक्षक अशोक बंनकर यांचे दिशानिर्देशानुसार लोकल क्राइम ब्रांच द्वारा या हत्याकांडातील आरोपींचा तपास सुरू करून तीन दिवसांत लोकल क्राइम ब्रांच गोंदिया यांना यश  प्राप्त झाले.आणि या हत्याकांडात सहभागी तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. ज्यामध्ये रावणवाडी निवासी योगेश फागुलाल बोपचे वय २७ वर्षे,मरघट रोड बजाज वार्ड गोंदिया निवासी पोमेश पन्नालाल पटेल वय २५ वर्षे,आणि मरघट रोड बजाज वार्ड निवासी जोगेंद्र शंकर पटले वय १८ वर्षे यांचा समावेश आहे.

प्राप्त माहितीनुसार म्हसवानी येथील खुमराज बलीराम राहांगडाले १३  जून च्या सायंकाळी आपल्या बीमार मुलीसाठी औषध घेण्यासाठी खोडशिवनी येथे गेले होते.पण त्यांचे शव या मार्गावर पडले दिसले. या प्रकरणाचे  वैद्यकीय अहवालानुसार हत्या केली गेली असल्याचा  गुन्हा दाखल करून आरोपींच्या विरूद्ध भादंवी कलम ३०२ नुसार दाखल करण्यात आला. याप्रकरणाचे तपास लोकल क्राइम ब्रांच ला दिल्यानंतर सदर प्रकरणाचे तपासादरम्यान मृतक व आरोपी यांचे मध्ये जमीन विवाद सुरू होते अशी माहिती मृतकाचे मुलगा निखिल खुमराज राहांगडाले व मुलगी दामिनी उर्फ स्वाती यांनी दिलीपोलीस प्रशासन द्वारा  तकनिकी सहायतेने तपास करून या हत्याकांडाचा खुलासा केला. सर्वप्रथम आरोपी क्र.१ योगेश‌ बाबूलाल बोपचे  यांची चौकशी करून विचारपूस केले,तर त्याने अन्य दोन साथीदारासोबत हत्या केल्याचे कबूल केले.त्यानंतर दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले.त्या दोन्ही व आरोपींशी विचारपूस केली असता त्यांनी या हत्याकांडात शामिल असल्याचे कबूल केले.सदर कार्यवाही पोलीस निरीक्षक लोकल क्राइम ब्रांच च्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विजय शिंदे, सफौ.कापगते, लिलेंद्र बैस, पोहवा.राजेंद्र मिश्रा,पोना.तुरकर, बिसेन तथा चालक पांडे द्वारा करण्यात आली.