तंत्र व उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सावंत यांच्या हस्ते व्हेंटिलेटर चे लोकार्पण - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

१४ जून २०२१

तंत्र व उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सावंत यांच्या हस्ते व्हेंटिलेटर चे लोकार्पण


शिरीष उगे(वरोरा प्रतिनिधी)
आज दि. 14 ला वरोरा येथे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकार्याने व्हेंटिलेटर लोकार्पण सोहळा उच्चतंत्र शिक्षण मंत्री उदय सावंत यांच्या उपस्थितीत सकाळी उपविभागीय कार्यालय येथे पार पाडला. कोरोना काळामध्ये ऑक्सिजन व व्हेंटिलेटर अभावी कोणत्याही रुग्णांचा मृत्यू होऊ नये यासाठी सामाजिक बांधिलकी जपत वरोरा मध्ये व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
व उपविभागीय अधिकारी कार्यालय, वरोरा येथे 3 व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिल्यामुळे तालुक्यातील रुग्णांना व्हेंटिलेटर बेडसाठी शहराचा रस्ता धरावा लागणार नाही. तालुक्यातील रुग्णांना मोफत व्हेंटिलेटर बेड उपलब्ध होऊन उपचार होणार आहेत. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात या व्हेंटिलेटरचा निश्चितच उपयोग होईल. तसेच दिलेल्या व्हेंटिलेटरचा योग्य वापर करावा. असे निर्देशने त्यांनी आरोग्य विभागाला दिले. रुग्णांना उत्तम प्रकारच्या वैद्यकीय सेवा व उपचार मिळावे, या दृष्टिकोनातून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वतीने वरोरा तालुक्यात 3 व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या आधुनिक व्हेंटिलेटरचा मोठा फायदा रुग्णालयातील रुग्णांना होणार आहे.  लोकार्पण नंतर पत्रकार परिषद  घेण्यात आली.  व विविध पक्षांनी निवेदने देण्यात आली.
       वरोरा येथील लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे, तहसीलदार प्रशांत बेडसे, गट विकास अधिकारी श्री.वानखेडे, शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मते, शिवसेना तालुका प्रमुख मुकेश जिवतोडे, मनिष जेठाणी, शिला आगलावे, कीर्ती पांडे, प्रीती साव, अल्का वाटकर, कल्पना भुसारी, घनशाम आस्वले, नंदूभाऊ पढाल, रमेश मेश्राम, राहुल खोडे, संदीपभाऊ मेश्राम, राजू सारगंधार, अनिल गाडगे, गणेश चिडे, भूषण बुरेले, प्रज्वल जानवे व शिवसेना कार्यकर्ते तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.