त्या कामाची देयके अदा केली, तर अफरातफर कशी? आरोप सिद्ध करा --राहुल पावडे - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२१ जून २०२१

त्या कामाची देयके अदा केली, तर अफरातफर कशी? आरोप सिद्ध करा --राहुल पावडेजयस्वाल यांचा आरोप बिन बुडाचा व प्रसिध्दीसाठीच

चंद्रपूर/ प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक जयस्वाल यांनी केलेला आरोप बिन बुडाचा असून निव्वळ प्रसिद्धी साठी आहे.या आरोपात काहीही तथ्य नाही.त्यांनी आरोप सिद्ध करावे, असे स्पष्टीकरण उपमहापौर राहुल पावडे यांनी दिले.

ज्या विकास कामा बाबत ते बोलत आहेत, तेथील मतदार नागीनाबाग प्रभागात पूर्वी होते व आजही आहेत.मतदार विकास कामे व्हावी म्हणूनच निवडून देतात.विकास कामाच्या बळावर राजकारण केले पाहिजे.महानगरात आम्ही मनपाच्या माध्यमातून अनेक विकास कामे केली.


यात अनुसूचित जाती निधी, नगरोत्थान निधी पायाभूत सुविधा निधी अशा अनेक निधींचा समावेश आहे महानगराच्या विकासासाठी तत्कालीन पालकमंत्री, माजी अर्थमंत्री ,आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी विशेष निधी उपलब्ध करून दिला त्यामुळे महानगराचा झपाट्याने विकास झाला. विकासकामांचा विरोध करण्याचा हा प्रकार असून इतके संकुचित विचार नसावे. विकासकामांचा विरोध करण्याची ही पद्धत योग्य नाही.अशी पद्धत अवलंबविली जात असेल तर त्यांनी ते करावे. परंतु विकास कामे थांबणार नाही. नागरिकांची कामे करण्यासाठीच आम्ही लोकप्रतिनिधी झालो आहो.मनपाची निवडणूक जवळ येत असल्याने प्रसिद्धीच्या हव्यासा पोटी ही खटाटोप सुरू आहे. खिसीयांनी बिल्ली खम्बा नोचे, असे याला म्हणतात. विकास कामांना विरोध करणाऱ्यांना जनता जागा दाखवेल, असेही उपमहापौर राहुल पावडे यांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.