इरई नदीच्या काठावर वृक्षारोपण - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०७ जून २०२१

इरई नदीच्या काठावर वृक्षारोपण
चंद्रपूर : इरई झरपट नदी बचाव आंदोलन समितीच्या वतीने वसुंधरा दिनाचे औचित्य साधून विठ्ठल मंदिरामागील किल्ल्याबाहेरील रुईबन हनुमान मंदिरसमोरील इरई नदीच्या काठावर वृक्षारोपण करण्यात आले.
चंद्रपूर शहर हे प्रदुषित शहर म्हणून ओळख आहे. ऐतिहासिक गोंङकालीन झरपट व इरई नदी सध्या अखेरच्या घटका मोजत आहेत. चंद्रपूर शहरातील पर्यावरण अबाधित राखण्यासाठी इरई झरपट नदी बचाव आंदोलन समितीच्या वतीने उपक्रम आयोजित केले जात आहेत. यायाच एक भाग म्हणून इरई नदीच्या काठावर वृक्षारोपण करण्यात आले. वङ, पिंपळ, कडुलिंब आदी वृक्षांचे रोपण करण्यात आले. यावेळी देवानंद साखरकर, अश्विन मुसळे, बाळा कोतपेल्‍लीवार, समीर लाभे, मनीष पांडे, स्वाती बोरङकर, चेतन पटेल, गणेश मेश्राम, रोहित बेलसरे, ओंकार मते, रेलू मुसळे, तुषार लाभे, जतीन पटेल, रोहन पाटील, रोहित तुराणकर, नंदू लभाने यांची उपस्थिती होती..