वसुंधरा हिरवीगार करा- किरणताई कांबळे - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत०६ जून २०२१

वसुंधरा हिरवीगार करा- किरणताई कांबळे

 वसुंधरा हिरवीगार करा- किरणताई कांबळे

भाजपा महिला मोर्चाच्या वतीने वृक्षारोपण व कोरोना योध्याचा सत्कारसंजीव बडोले प्रतिनिधी.


नवेगावबांध दि.6 जून:-


अर्जुनी मोरगाव भाजपा महिला मोर्चा च्या वतीने स्थानिक एस अध्यापक विद्यालयात जागतिक पर्यावरण दिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला.माजी जि.प सदस्या तथा गोंदिया जिल्हा भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाउपाध्यक्ष किरणताई कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली विश्व पर्यावरण दिवसाचे औचित्य साधून कोरोना काळात जीवाची बाजी लावून सेवा देणाऱ्या आशा सेविकांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला.यावेळी किरणताई कांबळे यांनी आशा सेविकांची कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अल्प मानधनावर सेवा सुरू आहे. शासनाने आशा सेविकांचे मानधन वाढवून त्यांना किमान दहा हजार रुपये मानधन निश्चित करावे.सेविकांचा सेवा दरम्यान मृत्यू झाला असेल तर त्यांच्या कुटुंबियांना शासकीय मदत मिळावी अशी मागणी केली.जगात कोरोनाने हाहाकार माजवला.रुग्णांना मोठ्याप्रमाणावर ऑक्सिजनची गरज भासली.हजारो रुपये खर्च करून ऑक्सिजन विकत घ्यावे लागले.मानवासाठी ऑक्सिजनची किती आवश्यकता आहे.या परिस्थितीने दाखवून दिले. म्हणून प्रत्येकाने जीवनात एक तरी झाड लावा,ही वसुंधरा हिरवीगार करावी असे आवाहन उपस्थितांना केले.कोरणा योद्धा म्हणून आशा सेविका मयुरी हातझाडे, वंदना उईके, ज्योत्सना राऊत,रिता मेश्राम, कांचन लांजेवार,मंगला शहारे, योगिता जांभूळकर आणि पंचशीला टेंभुरने यांचा उपस्थितांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह आणि रोपटे देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी महिला मोर्चा तालुका अध्यक्ष मंजुषा तरोनेमाजी नगरसेविका वंदना शहारे उपस्थित होते.