सोमवारी होणार १५ ऑक्‍सीजन कॉन्‍सन्‍ट्रेटर चे वाटप - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत०६ जून २०२१

सोमवारी होणार १५ ऑक्‍सीजन कॉन्‍सन्‍ट्रेटर चे वाटप

आ. सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार


विधीमंडळ लोकलेखा समिती अध्‍यक्ष तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने उद्या सोमवार (७ जून) ला येथील शासकीय विश्रामगृहात १५ ऑक्‍सीजन कॉन्‍सन्‍ट्रेटर चे वाटप आ. मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते दुपारी २ वा. केले जाणार आहे. याप्रसंगी भाजपा जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, महानगर जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहूल पावडे, स्‍थायी समिती अध्‍यक्ष रवि आसवानी, भाजपा संघटन महामंत्री राजेंद्र गांधी, महामंत्री सुभाष कासनगोट्टूवार, ब्रिजभूषण पाझारे, रविंद्र गुरनुले, कोषाध्‍यक्ष प्रकाश धारणे, भाजयुमो महानगर जिल्‍हाध्‍यक्ष विशाल निंबाळकर यांची प्रामुख्‍याने उपस्थिती राहणार आहे.पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्‍या नेतृत्‍वातील केंद्र शासनाचे सात वर्ष नुकतेच पुर्ण झाले. याअनुषंगाने भारतीय जनता पार्टीतर्फे विविध सेवा प्रकल्‍प संपूर्ण जिल्‍हयात राबविले जात आहे. या माध्‍यमातुन शेवटच्‍या माणसाची सेवा करण्‍याचा संकल्‍प आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या नेतृत्‍वात भाजपाच्‍या विविध पदाधिकारी व कार्यकर्त्‍यांनी घेतला असून त्‍याचाच एक भाग म्‍हणून ऑक्‍सीजन कॉन्‍सन्‍ट्रेटर वाटप केले जात आहे. सोमवारला पार पडणा-या कार्यक्रमात चंद्रपूर, अहेरी, पळसगाव जाट (ता. सिंदेवाही), कोरपना, भद्रावती येथील जनतेसाठी एकूण १५ ऑक्‍सीजन कॉन्‍सन्‍ट्रेटर आ. मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते प्रदान केले जातील. कोरोनाच्‍या पार्श्‍वभूमीवर नागरिकांच्‍या आरोग्‍याच्‍या रक्षणासाठी हा उपक्रम भारतीय जनता पार्टीच्‍या वतीने राबविण्‍यात येत आहे, अशी माहिती प्रसिध्‍दी पत्रकातुन देण्‍यात आली आहे.