पावसामुळे घर कोसळले; एका वृद्धाचा घटनास्थळी मृत्यु - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

१२ जून २०२१

पावसामुळे घर कोसळले; एका वृद्धाचा घटनास्थळी मृत्युशिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) : तालुक्यात सतत पावसामुळे घर कोसळून घरात झोपलेल्या एका वृद्धाचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना दि.११ जूनला रात्रीच्या सुमारास तालुक्यातील पिपरी (देशमुख) येथे घडली. भाऊराव कडुकर (८०) रा.पिपरी असे वृद्ध मृत इसमाचे नाव आहे.

गेल्या ४-५ दिवसापासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे सदर घर कोसळले. रात्री सतत पाऊस सुरु होता यावेळी मृतक भाऊराव वृद्ध गाळ झोपेत असतांना अचानक त्यांच्या अंगावर घर कोसळले त्यात त्यांचा ८० वर्षीय वृद्ध इसमाचा यात मृत्यु झाला. वृद्धाच्या अशा या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे .