माहिती व जनसंपर्क विभाग गोळा करतेय माध्यमांची जंत्री - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत१७ जून २०२१

माहिती व जनसंपर्क विभाग गोळा करतेय माध्यमांची जंत्री

महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क संचालनालयाने सर्व वृत्तपत्र, वृत्तवाहिन्याकडून  कोरोना काळातील आपत्तीत माध्यमांवर झालेले सकारात्मक आणि नकारात्मक परिमाणाची माहिती गोळा करीत आहे. ही माहिती २१ जूनपूर्वी सादर करणे अनिवार्य आहे. 

आपल्या दैनिकाचे/साप्ताहिकाचे नांव व प्रकाशन स्थळ, दैनिक सुरु केलेले वर्ष, आरएनआय क्रमांक आहे काय ? शासनमान्य जाहिरात यादीवर आहेका? असल्यास कोणत्या वर्गवारीत आहात? आपल्या वृत्तपत्राचा खप किती ?, आपल्याकडे एकूण किती कर्मचारी नोकरीत आहेत? प्रत्यक्ष प्रकाशनस्थळी, तालुक्यात आहण राज्यभर किती वार्ताहर आहेत, किती कर्मचारी/वार्ताहरांना/पत्रकारांना वेतन आयोगाप्रमाणे वेतन दिले जाते? किती कर्मचारी मानधन तत्वावर काम करतात ? मानधन तत्वावर काम करणाऱ्या वार्ताहरांची संख्या किती? आपल्या वृत्तपत्रातील अधिस्वीकृतीधारक पत्रकारांची संख्या किती ?, .आपले वृत्तपत्र समाज माध्यमांद्वारे जनतेपयंत जाते? उदा: ई-पेपर, ट्वीटर, फेसबुक, इत्यादी माध्यमांवर आहात का? कोरोनामुळे माध्यमावर परीणाम झाला आहेका जाहिरातीचे प्रमाण घटले का? साखळी वृत्तपत्रात खर्च  कपातीसाठी कर्मचारी कपात झाली आहे का?, साखळी वृत्तपत्रात कर्मचारी कपात न करता के वळ वेतन कपात केली आहे का? यासह श्रमिक पत्रकारांकडूनही वैयक्तिक माहिती गोळा केली जात आहे. 


 पत्रकारासाठी  फॉर्म   2021  

https://online.fliphtml5.com/kvwdu/dltj/