स्वबळाची भाषा : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांना दिल्लीला येण्याचे फर्मान; फेरबदलाची मोठी शक्यता - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२४ जून २०२१

स्वबळाची भाषा : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांना दिल्लीला येण्याचे फर्मान; फेरबदलाची मोठी शक्यता


#nanapatole #mh #congress #khabar

मुंबई - शरद पवार हे दिल्लीला गेल्यापासून राजकीय हालचाली वाढल्या आहेत. यातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (महाराष्ट्र) नाना पटोले यांनी स्वबळाची भाषा केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले. मात्र, नाना पटोलेंना अचानक दिल्लीला बोलावलं गेल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. शरद पवार यांनी दिल्लीत राष्ट्रमंचची बैठक घेतली. त्यानंतर दोन दिवसातच नाना पटोले यांना दिल्लीत बोलवण्यात आलं आहे.

धुळे जिल्ह्याचा दौरा अर्धाच सोडून नाना पटोले मुंबईत पोहचतील त्यानंतर उद्या म्हणजेच शुक्रवारी नाना पटोले हे दिल्लीला जाणार आहेत. विधानसभा अध्यक्षांचे नाव निश्चित करण्यासाठी दिल्लीत जात आहोत असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. मात्र, पक्षश्रेष्ठींच्या आदेशानंतर नाना पटोले हा दौरा अर्धवट सोडून आता दिल्लीला जाणार आहेत. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दिल्लीत गेल्यानंतर राजकारण ढवळून निघालं असताना काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीला नाना पटोले जाणार आहेत.

शरद पवार यांच्या दिल्लीतील हालचालीनंतर नाना पटोले यांच्यासह इतर नेत्यांना दिल्लीत बोलावलं आहे. राज्याच्या विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन जाहीर झालं आहे. मात्र, विधानसभा अध्यक्षाची निवड झालेली नाही. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांचे नाव निश्चित करण्यासाठी दिल्ली जात असल्याचं नाना पटोलेंनी सांगितलं. मात्र, हे एकच कारण यामागे नसणार. कारण शरद पवार हे दिल्लीला गेल्यापासून राजकीय हालचाली वाढल्या आहेत..