महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी अध्यक्ष नाना पटोले यांचे भद्रावतीत भव्य स्वागत - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत०८ जून २०२१

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी अध्यक्ष नाना पटोले यांचे भद्रावतीत भव्य स्वागतशिरीष उगे(भद्रावती प्रतिनिधी)

    भद्रावती तालुका काँग्रेस कमेटी व माजरी कॉलरी इंटक युनियनचे संयुक्त विद्यमाने स्थानिक पेट्रोल पंप चौक येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचे भव्य स्वागत करण्यात आले. ते चंद्रपूर येथून वरोरा येथे परत जात असतांना कार्यकर्त्यांशी हितगुज करण्यासाठी थांबले होते. याप्रसंगी मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले होते.

    तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष भगतसिंग मालुसरे, वेकोली माजरी क्षेत्रातील इंटक युनियनचे अध्यक्ष धनंजय गुंडावर, पंचायत समिती सदस्य चिंतामण आत्राम, माजी सभापती परशुराम जांभुळे, धर्मेंद्र हवेलीकर, प्रेमदास आस्वले, नरेश सिह, गोला कुमारय्या, रवी कुळदुला, अविनाश गोंडे, बंडू वैद्य तसेच काँग्रेस कार्यकर्ता व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.