नागपुरातील अनलॉकच्या नियमात सोमवारपासून बदल - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

१३ जून २०२१

नागपुरातील अनलॉकच्या नियमात सोमवारपासून बदल


नागपूर/खबरबात:
नागपुरातील अनलॉकच्या नियमात सोमवारपासून बदल करण्यात आला असून आता आधार कार्ड केंद्र, कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट टायपिंग इन्स्टिट्यूट, नर्सिंग इन्स्टिट्यूट सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय आज जिल्हा प्रशासन, महापालिकेने घेतला. सायंकाळी पाच वाजेपर्यंत या संस्था सुरू राहणार आहे. त्याच सोबत मॉलमधील रेस्टॉरेंटलाही दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली.

निर्बंध आणखी शिथिल करण्यासंदर्भात बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सायंकाळी आधार कार्ड केंद्र, कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, टायपिंग इन्स्टिट्यूट, नर्सिंग इन्स्टिट्यूट सोमवारपासून पाच वाजेपर्यंत सुरू करण्यासंदर्भात आदेश काढले. कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, टायपिंग इन्स्टिट्यूट, नर्सिंग इन्स्टिट्यूट २० विद्यार्थी किंवा हॉलच्या क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने सुरू करता येणार आहे. विद्यार्थ्यांच्या दोन बॅचेसमध्ये एक तासाचे अंतर ठेवणेही बंधनकारक आहे. प्रत्येक बॅचच्या क्लास संपल्यावर सॅनिटायझेशन आवश्यक करण्यात आले आहे. आतापर्यंत केवळ रेस्टॉरंट १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा होती. आता मात्र मॉलमधील रेस्टॉरेंटही एकूण आसन क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहे. परंतु, इनडोअर क्रीडा संकुल सुरू करणे टाळण्यात आले.